इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला तीन बाद ५३ धावांवर रोखण्यात यश मिळवले. दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळ आधी भारतीय संघाला या सामन्यातील सर्वात मोठी विकेट मिळाली. ती विकेट होती, इंग्लंडचा कर्णधार जो रूट याची.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने मालिकेतील आपला पहिला कसोटी सामना खेळत इंग्लंडचा कर्णधार रूटला पहिल्या दिवसाच्या शेवटच्या क्षणात बाद केले. रूटला बाद करून यादवने इंग्लिश संघाला सर्वात मोठा धक्का दिला आणि भारताला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले. यादवने रूटविरुद्ध चांगली लेंथ कायम ठेवत गोलंदाजी केली आणि शेवटी त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले.
तर झाले असे की, यादवच्या वेग आणि स्विंगसमोर रूट अतिशय बेजार झाला होता. शेवटी त्याचा १५ व्या षटकातील तिसरा चेंडू वेगात आत आला आणि रूटची बॅट येण्यास उशीर झाला, ज्यामुळे तो त्रिफळाचीत झाला. अवघ्या २१ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. या विकेटसह भारतीय संघापुढील सर्वात मोठा अडथळा मिटला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इंग्लंडकडे आता फक्त सात गडी बाकी आहेत आणि इंग्लड संघ अजून भारतापेक्षा १३८ धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी, बुमराहने इंग्लिश डावाच्या चौथ्या षटकात आणि त्याच्या दुसऱ्या षटकात दोन्ही इंग्लिश सलामीवीरांना तंबूत पाठवून इंग्लंडला दुहेरी धक्का दिला होता. आता या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला इंग्लंड संघाला पटकन सर्वबाद करावे लागेल. आणि नंतर दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून इंग्लडवर वर्चस्व मिळवावे लागेल.
MASSIVE moment in the day as Umesh Yadav sneaks one past Root’s forward defence to disturb the woodwork.
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Root #Yadav pic.twitter.com/yPXyQbjLLH
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 2, 2021
https://twitter.com/Iam_Ayushmann/status/1433482628313718813?s=20
दरम्यान, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नाही. भारताचे रोहित शर्मा (११), केएल राहुल (१७), चेतेश्वर पुजारा (४), रिषभ पंत (९), अजिंक्य रहाणे (१४) रविंद्र जडेजा (१०) हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. केवळ विराटने ५० धावा करत थोडीफार झुंज दिली.
जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरी, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र, आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट ठरलाय गावसरकर-धोनीलाही सरस, खास विक्रम नावावर करत झालाय एक नंबर
मैदानातील कट्टर वैरींमध्ये ओव्हल कसोटीत दिसला ‘याराना’, कोहली-अँडरसनच्या फोटोंनी चर्चेला उधाण
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल