आयपीएल २०२२ चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळला गेला. उमेश यादवच्या घातक गोलंदाजीपुढे सीएसकेने सुरुवातीच्या महत्वाच्या विकेट्स गमावल्या आणि याच कारणास्तव त्यांना पराभव पत्करावा लागला. केकेआरने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. उमेश यादवला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले आणि तो सर्वाधिक आयपीएल सामन्यांमध्ये सामनावीर ठरलेला वेगवान गोलंदाज बनला आहे.
सीएसेकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) मागच्या आयपीएल हंगामात जबरदस्त खेळला होता. या सामन्यात ऋतुराजकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होता, पण उमेश यादवने टाकलेल्या पहिल्याच षटकात तो झेलबाद झाला. स्लीपमध्ये उभा असलेल्या नितेश राणाने कसलीही चूक न करता ऋतुराजचा झेल पकडला.
त्यानंतर उमेशला दुसरी विकेट मिळाली, ती त्याच्या तिसऱ्या षटकात. त्याने टाकलेल्या डावाच्या पाचव्या षटकात सलामीवीर डिवॉन कॉन्वे (Devon Conway) मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयस अय्यरच्या हातात झेलबाद झाला. उमेशने सलामीवीरांच्या या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्यामुळे सीएसकेला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि केकेआरने सोपा विजय मिळवला.
सामना जिंकल्यानंतर उमेश यादवला सामनावीर निवडले गेले. ही ९ वी वेळ आहे, जेव्हा उमेश यादव एखाद्या आयपीएल सामन्यात सामनावीर ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक वेळा सामनावीर बनलेला वेगवान गोलंदाज आहे. सर्वाधिक आयपीएल सामन्यांमध्ये सामनावीर बनणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत उमेश यादवनंतर लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, आणि जयदेव उनाडकट आहेत. या चौघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी ६ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. त्यानंतर नाव येते ते, डेल स्टेन, संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचे. या तिघांच्या नावावर प्रत्येकी ५ सामनावीर पुरस्कारांची नोंद आहे.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर केकेआरने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ५ विकेट्सच्या नुकसानावर १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८.३ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या आणि विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
लाईव्ह आयपीएल सामन्यादरम्यान जागे झाले धोनीचे फुटबॉल प्रेम, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल
आजचा सामना: कधी, केव्हा आणि कुठे होणार पंजाब-बेंगलोर सामना, जाणून घ्या एका क्लिकवर
IPL2022| पंजाब वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!