---Advertisement---

भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ

viral video umesh yadav
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातही संघाने घवघवीत यश मिळवले आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (०-३) दिला, तसेच उभय संघातील टी-२० मालिका भारताने १-४ अशा अंतराने जिंकली. असे असले तरी, भारतीय संघाचा एक असा गोलंदाज आहे, जो वेस्ट इंडीज दौऱ्यात नव्हता, पण सध्या चांगलाच चर्चेत आहे. आगामी आशिया चषकासाठीही या गोलंदाजाला भारतीय संघात निवडले गेले नाहीये. 

भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून उमेश यादव (Umesh Yadav) आहे. भारतीय संघ सध्या टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये व्यक्त आहे आणि उमेश यादवला मात्र फक्त भारताच्या कसोटी संघात संधी मिळत आहे. दुसरीकडे भारतात देशांतर्गत क्रिकेटचा नवीन हंगाम देखील अद्याप सुरू झाला नाहीये. अशात उमेश इंग्लंडमध्ये त्यांचे देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. जेव्हा तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर होता, त्यादरम्यानच्या काळात मिडलसेक्स संघाने त्याला करारबद्ध केले होते. उमेश त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिपच्या काही सामन्यांमध्ये खेळला आणि आता वनडे स्पर्धेत स्वतःची गुणवत्ता दाखवत आहे.

इंग्लडच्या याच देशांतर्गत वनडे मालिकेतील एक सामना ७ ऑगस्ट रोजी खेळला गेला. सामन्यात मिडलसेक्स आणि डरहम काउंटी संघ आमने सामने होते. उमेश यादव मिडलसेक्स संघाच्या प्रमुख गोलंदाजाच्या रूपात खेळत होता आणि पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी आला. आजपर्यंत क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांची डोकेदुखी ठरलेला उमेश या सामन्यात इंग्लंड गोलंदाजांसाठी प्रमुख बाधा बनला. सामन्यातील दुसऱ्याच चेंडवर त्याने डरहम संघाचा सलामीवीर ग्राहम क्लार्कचा त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकात अजून एक विकेट घेतली.

https://twitter.com/Middlesex_CCC/status/1556588596148293632?s=20&t=626IBTZ7vNdYKx_rL0NkWA

डरहम संघाची सलामीवीर जोडी तंबूत परतल्यानंतर मध्यक्रमातील एका फलंदाजाला बाद केले. हा फलंदाज उमेशच्याच चेंडूवर त्याच्याच हातात झेलबाद झाला. त्यानेतर दोन फलंदाज उमेशच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाले. उमेशने या सामन्यात एकूण ९.२ षटकांमध्ये ३३ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मिटलसेक्स संघाने डरहमला २६८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मिडलसेक्सने १ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार स्टीफन एस्कीनाजीने नाबाद १४६ धावांची खेळी केली. अशा पद्धतीने मिडलसेक्सने या हंगामातील पहिला विजय मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

बुमराह आशिया चषकातून बाहेर, तरीही टीम इंडियाला नाही चिंता! ‘हा’ खेळाडू आहे कारण

अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर

नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---