इंग्लंड क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिला सामना यजमान आफ्रिकी संघाने जिंकला. मागच्या काही वर्षांमध्ये वनडे क्रिकेटच्या तुलनेत टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधील चाहत्यांची आवड वाढत आहे. वनडे क्रिकेट मात्र दिवसेंदिवस कमी लोकप्रिय होताना दिसते. चाहत्यांसह खेळाडू देखील मागच्या काही वर्षांमध्ये या फॉरमॅटकडे पाठ फिरवताना दिसले आहेत. पण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात थेट पंचांकडूनच वनडे सामन्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये काही माजी क्रिकेटपटू वनडे क्रिकेट संपत चालले आहे, असे म्हटले आहेत. दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही क्रिकेटपटूंनी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती देखील घेतली आहे. चाहते आणि खेळाडूंना या फॉरमॅटमध्ये अधिक रस राहिल्याचे दिसत नसले, तरी पंच मात्र त्यांचे काम चोख पार पाडत असतात. चाहत्यांनी सामना पाहिला किंवा नाही पाहिला तरी पंचांना मात्र सामन्यांतील प्रत्येक चेंडू पाहावा लागतो. पण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात चित्र काही वेगळेच दिसले. मैदानी पंच मरे इरॅस्मस (Marais Erasmus) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
सामना सुरू असताना पंचांना प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवावे लागते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण शुक्रवारी (27 जानेवारी) पंच मरे इरॅस्मस यांचे सामन्यावर लक्ष नसल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यात मरे इरॅस्मस मैदानी पंचाची भूमिका पार पाडत होते. पण यावेळी ते स्वतः देखील वनडे क्रिकेटला कंटाळल्याचे दिसले. इंग्लंडच्या डावातील 25 व्या षटकात गोलंदाजाने चेंडू टाकला आणि फलंदाजाने त्यावर चांगला शॉट देखील मारला, पण मरे इरॅस्मस यांचे लक्ष भलतीकडेच होते. हा चेंडू टाकून फलंदाजाने खेळला देखील पण पंच मात्र प्रेक्षकांकडे पाहत होते.
https://twitter.com/_FaridKhan/status/1619189684277772289?s=20&t=aGNguznSekRjgDGyS_-lZw
सुदैवाने या चेंडूवर फलंदाज बाद झाला नाही किंवा चेंडू नो बॉल नव्हता. जर असे काही झाले असते, तर पंचांना निर्णय देताना अडचणी येऊ शकत होत्या. एन्रिक नॉर्कियाने टाकलेल्या या चेंडूवर जेसन रॉय फलंदाजी करत होता. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर आवाज आला आणि नंतर पंचांना चेंडू टाकला गेल्याचे समजले. मरे इरॅस्मस यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकांमध्ये 7 बाद 298 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 44.2 षटकांमध्ये 271 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी इंग्लंडने या सामन्यात 27 धावांनी पराभव स्वीकारला. (Umpire Marais Erasmus made a big mistake in the ODI match between South Africa and England)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही बनला सूर्याचा फॅन; तोंडभरून कौतुक करत आयसीसीलाच म्हणाला, ‘तो क्रांती घेऊन येतोय’
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी राणी! बेलारूसच्या अरिना सबालेंकाने रचला इतिहास






