---Advertisement---

आयपीएलवर कोरोनाची सावली गडद! खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार 

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 9:50 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ ही स्पर्धा यंदा भारतातच आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र यंदा भारतातच हा हंगाम घेण्याचे आयोजकांनी निश्चित केले होते. आयपीएल २०२१ स्पर्धा आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता खेळाडूंपाठोपाठ याच कारणामुळे अंपायरने देखील माघार घेतल्याचे दिसून आले आहे.

दोन अंपायर्सनी घेतली माघार 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध भारतीय अंपायर नितीन मेनन हे आपल्या घरी परतले आहेत. त्यांच्या आईला आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे अंपायर पॉल रायफल यांनी देखील माघार घेतली आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या बघून ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातली होती. त्यामुळे रायफल यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलतांना म्हटले की, “नितीन मेनन यांना एक लहान मुलगा आहे. पत्नी आणि आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे पॉल रायफल यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चिंता वाटत होती. मात्र यांच्या माघारीमुळे काळजीचे कारण नसून आमच्याकडे इतरही खूप अंपायर आहेत. जे आता मैदानावर दिसतील.”

खेळाडूंनी देखील घेतली होती माघार 
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत सहभाग घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. यात एडम झंपा, केन रिचर्डसन आणि एंड्रयू टाय यांचा समावेश होता. तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने देखील आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या:

फॅफ ड्यू प्लेसिसने धवनला मागे टाकत गाठले अव्वल स्थान, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-५ खेळाडू

आयपीएल २०२१ : चेन्नई अव्वल, तर हा संघ तळाला, पाहा कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---