आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पंचांच्या एलीट पॅनलची घोषणा केली आहे. मुळचे भारतीय असलेले नितीन मेनन यांना एलीट पॅनलमध्ये कायम ठेवले गेले आहे. नितीत या महिन्याच्या शेवटी श्रीलंकामध्ये पहिल्यांदाच तटस्ट पंचाच्या रूपात आयसीसीला सेवा पुरवणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत ते पंच म्हणून उपस्थित असतील.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला याबाबतीत माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, “आयसीसीने नितीन मेनन (Nitin Menon) यांचा एलीट पॅनलमधील कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. इंदोरचा ३८ वर्षीय मेनन एलीट पॅनलच्या ११ सदस्यांपैकी एक आहेत. या पॅनलमध्ये त्यांच्याव्यतिरिक्त एकही भारतीय सहभागी नाही.”
बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, “आयसीसीने नुकताच मेननचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. ते मागच्या तीन ते चार वर्षांपासून आपले प्रमुख पंच राहिले आहेत. ते या महिन्याच्या शेवटी तटस्ट पंचाच्या रूपात पदार्पण करतील.”
नितीन मेननला २०२२ मध्ये आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये पहिल्यांदाच सामील केले गेले होते. मेनन एल वेंकटराघवन आणि एस रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत, ज्यांना आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये सहभागी केले गेले आहे. असे असले तरी, मागच्या दोन वर्षांमध्ये त्यांना फक्त भारतात खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावता आली. कारण आयसीसीने स्थानिक पंचांना प्रवासाच्या अटींमुळे मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये काम करण्याची मुभा दिली होती.
तसे पाहिले तर नितीन मेननकडे कामाच अनुभव जास्त नाहीये, पण त्यांनी खूप कमी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मैदानात दिलेला निर्णय हा खूपच कमी वेळा चुकीचा ठरतो. त्यांनी एकूण ६८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. यामध्ये ११ कसोटी, ३० एकदिवसीय आणि २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये त्यांना बऱ्याच वर्षांपासून काम केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया
‘प्रशिक्षकांनी हार्दिकला शिकवण्याची गरज नाही’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केलेल्या विधानाने खळबळ
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ