---Advertisement---

उमरान मलिकने हार्दिक पंड्याच्या पत्नीची हात जोडून मागितली क्षमा, पण का? घ्या जाणून

On: शुक्रवार, एप्रिल 29, 2022 3:54 PM
Umran-Apologize-Natasha
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२२चा ४०वा सामना झाल्यानंतर उमरान मलिकचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिकशी क्षमा मागताना दिसत आहे. 

उमरान मलिकने का मागितली नताशाची क्षमा?

हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त लयीत आहे. परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या हंगामातील ४०व्या सामन्यात त्याला खास प्रदर्शन करता आले नाही. दरम्यान त्याला चेंडू लागला, ज्यामुळे त्याची पत्नी नताशा चिंताग्रस्त दिसली.

हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad vs Gujrat Titans) १९६ धावांच्या आव्हानाच्या पाठलाग करताना गुजरातच्या आठव्या षटकात हा प्रसंग घडला. पंड्या या षटकात नुकताच (Hardik Pandya) फलंदाजीला आला होता. हैदराबादकडून उमरान मलिक (Umran Malik) हे षटक टाकत होता.

मलिकने पंड्याला पहिलाच चेंडू १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला, जो सरळ पंड्याच्या उजव्या खांद्याला (Umran Hits Off Hardik’s Shoulder) जाऊन लागला. त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. पंड्याची पत्नी नताशा (Natasha Stankovic) हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये आली होती. आपल्या पतीला चेंडू लागल्याचे पाहून ती खूप चिंतेत (Natasha Stankovic Reaction पडली होती. यानंतर उमरान आपल्याकडून नकळत झालेल्या या चुकीसाठी नताशाची क्षमा मागताना (Umran Malik Apologize Hardik’s Wife) दिसला आहे.

Umran-Apologize-Natasha
Photo Courtesy: Twitter

विस्डेन इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये मलिक हात जोडून उभा आहे. त्याच्या मागे हार्दिक आणि राशिद खान मजेशीर अंदाजात त्याला पकडून उभे आहेत. मलिकच्या चेहऱ्यावरही मोठी स्माईल दिसत आहे. विस्डेन क्रिकेटने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘क्षमा कर सिनीयर.’

या पोस्टवर एका ट्वीटर वापरकर्त्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ‘उमरान स्टेडियममध्ये उपस्थिथ हार्दिक पंड्याच्या पत्नीशी क्षमा मागत आहे.’

गुजरातने पुन्हा मारली बाजी

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने २० षटकात ५ विकेट्स गमावत हैदराबादचे लक्ष्य पूर्ण केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---