---Advertisement---

नो बॉल, वाईड, पुन्हा नो बॉल; आधी व्हिलन बनलेला उमरान मलिक शेवटी ‘असा’ ठरला हिरो

Umran-Malik-Ishan-Kishan
---Advertisement---

बऱ्याचदा एखाद्या क्रिकेट सामन्यात एखाद्या खेळाडूला किंवा संघाला चांगली सुरुवात मिळत नाही. परंतु पुन्हा धडाकेबाज प्रदर्शन करत खेळाडू किंवा संघ सामन्यात तगडे पुनरागमन करतात. सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने नुकताच याचा प्रत्यय दिला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तो सुरुवातीला संघासाठी खलनायक ठरला. परंतु त्याने पुढे दमदार पुनरागमन करत संघाला सामना जिंकून दिला आणि विजयाचा नायकही ठरला. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १९३ धावा केल्या होत्या आणि मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले होते. यानंतर आता हैदराबादच्या गोलंदाजांवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर या अनुभवी गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केल्यानंतर उमरान मलिक (Umran Malik) डावातील नववे षटक टाकण्यासाठी आला होता. हे या सामन्यातील त्याचे पहिलेच षटक होते आणि याच षटकात त्याने अतिशय महागडी (Expensive First Over) गोलंदाजी केली.

त्याने षटकातील पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर वाईड फेकला व पुन्हा नो बॉल टाकला. त्यामुळे मुंबईला अधिकच्या ३ धावा मिळाल्या. त्याच्या याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चौकार व सलामीवीर इशान किशनने षटकारही मारला. परिणामी मुंबईला या षटकातून १७ धावा मिळाल्या.

परंतु या महागड्या षटकानंतर तो खचला नाही आणि त्याने आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवत दमदार पुनरागमन (Umran Malik Comeback) केले. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात इशान किशनला ४३ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढील षटकात डॅनियल सॅम्स (१५ धावा) आणि तिलक वर्मा (०८ धावा) यांच्या विकेट्स घेतल्या. तसेच त्याने आपल्या २ षटकात केवळ ६ च धावा दिल्या.

अशाप्रकारे उमरान मलिकने पूर्ण सामन्यादरम्यान ३ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत मुंबईच्या ३ विकेट्स घेतल्या. त्याचे गोलंदाजीतील हे योगदान संघासाठी महत्त्वाचे ठरले. हैदराबादने आपल्या १९४ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना मुंबईला १९० धावांवरच रोखले आणि ३ विकेट्स राखून सामना जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आSSS! …अन् स्टँड्समधून मुंबईला चीयर करणारी सारा तेंडुलकर मोठ्याने किंचाळली, रिऍक्शन व्हायरल

अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार रोहितकडून महत्त्वाचे संकेत

मुंबईचा दहावा पराभव, पण ‘या’ खेळाडूने स्वत:ला केले सिद्ध; दाखवला चमकदार अष्टपैलू खेळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---