साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन कपचा (सॅफ) अंतिम सामना आज 15 सप्टेंबरला भारत विरुद्ध मालदीव असा होणार आहे. ढाकाच्या बंगबंधु स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला सायंकाळी 6.30ला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला 3-1 असे पराभूत करत अकराव्यांदा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यावेळी मानवीर सिंगने दोन गोल केले होते.
भारताचा हा 23 वर्षाखालील एकमेव संघ या स्पर्धेत अपराजित आहे. त्यांनी साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 2-0 आणि मालदिवला 2-0 असे पराभूत केले आहे.
गतविजेत्या भारताने मागील 11 मौसमात खेळताना सात वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर आज आठवे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरणार आहेत.
तसेच 2009मध्ये बंगबंधू स्टेडियमवर शेवटचा सामना भारत विरुद्ध मालदिव असा झाला होता. हा सामना भारताने पेनाल्टीमध्ये जिंकला होता.
मालदीव मागील तीन मौसमात अंतिम फेरीत खेळला नाही कारण ते या तीनही उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाले होते. तर भारत फक्त 2003 सोडून बाकीच्या मौसमांच्या अंतिम फेरीत खेळला आहे.
“मालदीवने उपांत्य फेरीत नेपाळला 3-0ने पराभूत करत ते पण काही कमी नाही हे दाखवून दिले आहे. आम्हीही नेपाळला साखळी फेरीत पराभूत केले आहे पण त्या सामन्यात त्यांचे तीन महत्त्वाचे खेळाडू खेळले नव्हते”, असे भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्टंटाइन म्हणाले.
“मालदीव विरुद्धचा सामना हा उत्कृष्ठ व्हायला हवा. तसेच आम्ही जिंकण्याच्या प्रबळ इच्छेने या स्पर्धेत उतरलो आहोत”, असेही ते पुढे म्हणाले.
या स्पर्धेत मानवीर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत 3 गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताने तीन सामन्यांत सात गोल केले आहेत. तसेच मालदीवच्या इब्राहीम वहीद हसनने पण 2 गोल केले आहेत.
“सगळ्यांची उत्कृष्ठ खेळ केला. आम्हाला स्वत:हावर विश्वास असल्याने सामन्याचे निकाल चांगले मिळाले. यामुळे आतापर्यंत ज्याप्रकारे आम्ही खेळ केला तसाच आजच्या सामन्यात करायचा आहे”, असे मानवीर म्हणाला.
मालदीव या स्पर्धेतील साखळी फेरीत दोन सामने खेळला असून भारता विरुद्ध पराभूत तर श्रीलंकेविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला. मात्र उपांत्य फेरीत नेपाळला त्यांनी 3-0 असे पराभूत केले.
“मला या खेळाडूंवर खूप गर्व होत आहे. ते ज्या पद्धतीने या स्पर्धेत खेळले आहेत तशाच प्रकारे ते भारता विरुद्ध खेळले तर त्य़ांना सामना जिंकण्यापासून कोणच रोखणार नाही”, असे मालदिवचे प्रशिक्षक पीटर सेग्रट म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही
-ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची
-ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची