---Advertisement---

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2019 6:44 PM
---Advertisement---

पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारी 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडणार आहे. या विश्वचषकाचे वेळापत्रक  आज जाहिर झाले आहे. या विश्वचषकाला 17 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 9 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगेल.

बेनोनी, पोचेफस्टरूम, ब्लॉमफॉन्टेन आणि किम्बरली या चार शहरातील 8 ठिकाणी या विश्वचषकातील सामने होतील.

तसेच या विश्वचषकातील साखळी सामन्यांसाठी 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागण करण्यात आली आहे. या विश्वचषकात गतविजेत्या भारतीय संघाचा न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानसह अ गटात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा पहिला सामना 19 जानेवारीला श्रीलंकाविरुद्ध ब्लॉमफॉन्टेन येथील मँगाउंग ओव्हल येथे होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जपान विरुद्ध 21 जानेवारीला आणि न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारी साखळी फेरीचे सामने खेळेल.

या स्पर्धेची सुरुवात यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने होणार आहे.

या स्पर्धेसाठी ब गटात गतउपविजेते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश आहे. क गटात पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि स्कॉटलँड यांचा समावेश असून ड गटात यजमान दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

या विश्वचषकात साखळी फेरीनंतर सुपर लीग आणि प्लेट या फेरी पार पडतील. साखळी फेरीनंतर चारही गटातील पहिल्या 2 क्रमांकावर असणारे संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतील. तर अन्य उर्वरित संघ प्लेट चॅम्पियनशीप खेळतील.

असे आहे 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी सहभागी संघांची गटवारी – 

अ गट – भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान

ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया, वेस्ट इंडीज

क गट – पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलँड

ड गट – दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, अफगाणिस्तान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---