---Advertisement---

फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक! मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याकडून बिहारच्या सुपुत्राचं तोंडभरून कौतुक!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 6, 2026 6:37 PM
---Advertisement---

अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर 412 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात बिहारच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) केवळ 80 चेंडूत 175 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Cheif minister of Bihar) यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बिहारच्या वैभव सूर्यवंशीने 175 धावा करून शानदार कामगिरी केली आहे. आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर तो भारतीय क्रिकेटची एक नवी आशा बनला आहे. वैभवने भविष्यात असेच नवनवे विक्रम प्रस्थापित करावेत आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच माझी शुभेच्छा.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पाटणा येथे पहिल्या ‘नेत्रहीन महिला टी-20 विश्वचषक 2025’ ची विजेती खेळाडू अनु कुमारी हिचा सत्कार करून तिला सन्मानित केले.

भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने (Ayush Mhatre) टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 175 धावा कुटल्या. त्याने आयुष म्हात्रेसोबत (53 धावा) दुसऱ्या विकेटसाठी 90 चेंडूत 142 धावांची भागीदारी केली. इतर फलंदाजांनी वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (40) आणि शेवटी कनिष्क चौहानने (नाबाद 37) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 411 धावांचा डोंगर उभा केला. तर इंग्लंडकडून जेम्स मिंटो याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---