भारतीय संघाचा फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. आता त्याची अधिकृतपणे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्याने भारतीय अंडर-१९ संघ आणि इंडिया ए संघासाठीही प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्या हातून अनेक असे हिरे घडले आहेत, जे भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.
द्रविडने दिलेल्या सल्ल्यामुळे गिलचा खेळ सुधारला
भारतीय अंडर-१९ संघाला २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाने विजय मिळवला होता. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गिलने शतकीय खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना झाल्यानंतर शुबमन गिलने आपल्या खेळीचे श्रेय राहुल द्रविडला दिले होते. द्रविडने त्याला हवेत शॉट्स खेळू नको असा सल्ला दिला होता.
गुरू म्हणून हिट आहे राहुल द्रविड
राहुल द्रविडने सुरुवातीला २०१२ -१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक पद सांभाळले होते. तो प्रशिक्षक असताना राजस्थान रॉयल्सने प्लेऑफ गाठले होते. त्यानंतर त्याने अंडर-१९ आणि इंडिया ए संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. २०१६ मध्ये त्याला दिल्ली डेयरडेविल्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्याची ऑफर आली होती. परंतु त्याने ती फेटाळून लावून अंडर १९ संघाला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. याचवर्षी भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघात रिषभ पंत, इशान किशन, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर देखील होते. या संघातील काही खेळाडू सध्या भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.
२०१८ मध्ये अंडर १९ विश्वचषक स्पर्धेवर कोरले होते नाव
या स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेचा लिलाव झाला होता. या लिलावात कमलेश नागरकोटी, शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंना संघांनी मोठी किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिले मिळाले होते. यामुळे त्यांचे खेळावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून, द्रविडने सर्वांचे मोबाईल बंद केले होते. तसेच खेळाडूंनीही त्याला निराश केले नव्हते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत भारतीय संघाने चौथ्यांदा अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या संघातील पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी भारतीय संघाकडूनही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
एक नकोसा तर दोन हवेहवेसे विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रविडच्या नावावर, मोडणे आहेत केवळ अशक्य
भारताला विश्वचषक जिंकून देणारा ‘तो’ कर्णधार ठरणार बिग बॅश खेळणारा पहिलाच क्रिकेटर