---Advertisement---

‘समुद्र आहे पण पोहू शकत नाही,’ ख्रिस गेलच्या भन्नाट पोस्टने वेधले लक्ष; होतेय व्हायरल

On: शुक्रवार, मे 7, 2021 1:12 PM
---Advertisement---

कोरोनाचा कठीण काळ असताना देखील भारतात आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कडक बायो बबलचा वापर करण्यात आला होता. पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने आणि आयपीएलच्या कमिटीने बैठक घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. अशातच युनिव्हर्सल बॉस देखील आपल्या मायदेशी परतला आहे. त्याचे फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आयपीएल स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ती पुन्हा केव्हा खेळवण्यात येणार आहे, याबाबत कुठलाही खुलासा केला गेला नाहीये. भारतातील परिस्थिती पाहता स्पष्ट दिसून येत आहे की, या स्पर्धेतील उर्वरित सामने भारतात खेळवण्यात येणार नाही. बीसीसीआय याबाबत इतर देशांसोबत चर्चा करत आहे.

दुसरीकडे आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि इतर देशातील खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. अशातच ख्रिस गेल देखील आपल्या मायदेशी परतला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने विमानातून ढगांचे फोटो तसेच स्पीड बोटमधून समुद्रातील काही फोटोज् शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत असणाऱ्या गेलने एका स्टोरीवर, “समुद्र आहे पण पोहायला जाऊ शकत नाही” असे लिहिले आहे.

Photo Courtesy: Instagram/@chrisgayle333
Photo Courtesy: Instagram/@chrisgayle333

पंजाब किंग्ज संघाची निराशाजनक कामगिरी
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार केएल राहुलला अर्ध्यातून दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले होते. त्याच्याऐवजी मयंक अगरवालने संघाचे नेतृत्व केले होते.

पंजाब किंग्ज संघाने या हंगामात एकूण ८ सामने खेळले आहेत. यात त्यांना अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच ख्रिस गेलच्या या हंगामातील कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. त्याने या हंगामात ८ सामने खेळले आहेत. यात त्याला अवघ्या १७८ धावा करण्यात यश आले होते. दरम्यान ४६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एक हात मदतीचा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘विरुष्का’ने लावला हातभार, दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

इरफान पठाणवर वृद्ध दांपत्याचा सुनेसोबत अवैध संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप, दिली आत्महत्या करण्याची धमकी

गोल्डन, सिल्वर अन् डायमंड डक करणाऱ्या पूरनची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा फोटो डोक्यात ठेवेल आणि…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---