---Advertisement---

विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराचे कुटुंबीय कोरोनाबाधित, रेमडीसिवरसाठी मागितली मदत

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 9:04 PM
---Advertisement---

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना या साथीच्या आजाराची दुसरी लाट आली आहे. दररोज भारतभर या जीवघेण्या आजाराचे लक्षावधी रुग्ण आढळून येत आहेत. जनसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. सगळीकडे या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा भासत आहे. त्याचवेळी, भारताला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदचे कुटुंबीय देखील कोरोनाबाधित झाले असून, त्याने ट्विटकरून मदतीची विनंती केली आहे.

ट्विट करून मागितली मदत
संपूर्ण भारताप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाने कहर केला आहे. भारताला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारा व भारत अ संघाचे नेतृत्व केलेल्या उन्मुक्त चंदच्या कुटुंबीयांना ही या आजाराने आपल्या जाळ्यात ओढले. परंतु, औषधांची गरज पूर्ण होत नसल्याने त्याने औषधांच्या मागण्यासाठी ट्विट करून मदत मागितली.

त्याने ट्विट करत लिहिले, ‘माझी आई व काका यांना तातडीने रेमेडीसीवर औषधांची गरज आहे. त्या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. काही माहिती असल्यास तात्काळ कळवा.’

यासह त्याने डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनचे छायाचित्र पत्त्यासह दिले. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक चाहत्यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.

विश्वविजेत्या संघाचा कर्णधार आहे उन्मुक्त
भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो कर्णधार होता. अनेक वर्ष दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्याने २०१९ मध्ये उत्तराखंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तो आयपीएलमध्ये दिल्ली डेरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघांचा भाग राहिला आहे. काही काळ त्याने भारताच्या अ संघाचे नेतृत्व देखील केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

दीपक चाहरने केली डीआरएसची घेण्याची जोरदार मागणी; धोनी म्हणाला, ‘जा…जा..’

ख्रिस गेलच्या भारत प्रेमाला तोड नाही, हिंदीनंतर शिकतोय ‘ही’ भारतीय भाषा

मध्यप्रदेशच्या क्रिकेटरला ऑनलाइन पिझ्झा मागवणे पडले महागात; झाली तब्बल ५० हजारांची लूट, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---