---Advertisement---

उन्मुक्त चंदने रचला इतिहास!! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय क्रिकेटर

On: मंगळवार, जानेवारी 18, 2022 5:22 PM
Unmukt Chand
---Advertisement---

भारतीय संघाने २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक (Icc under 19 world cup) स्पर्धेत उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) नेतृत्वाखाली जेतेपद मिळवले होते. परंतु, त्यानंतर अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. त्यामुळे त्याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील वाटचालीसाठी त्याने अमेरिकेची वाटचाल केली. आता त्याला एक मोठी संधी मिळाली आहे. यासह त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.

उन्मुक्त चंदला बिग बॅश लीग (Big bash league) स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. असा करणं कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. मंगळवारी (१८ जानेवारी) त्याला मेलबर्न रेनेगड्स (Melbourne renegades) संघाकडून खेळताना होबार्ट हरीकेन्स संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी त्याने मेलबर्न रेनेगड्स संघासोबत करार केला होता. आता त्याला ही संधी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) महिला क्रिकेटपटूंना महिला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. परंतु, भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंना पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाहीये. अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्नं बाळगणाऱ्या उन्मुक्त चंदने गेल्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, आता तो बिग बॅश लीग आणि इतर लीग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतो.

उन्मुक्त चंदने २०१२ मध्ये झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. अंतिम सामन्यात त्याने १११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला भारतीय अ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. परंतु, त्याला वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. उन्मुक्त चंदने २०१० मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यादरम्यान त्याने दिल्ली आणि उत्तराखंड संघाचे प्रतिनिधित्व केले.

महत्वाच्या बातम्या :

नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?

भावी कर्णधार’ म्हणून राहुलची होतेय चर्चा; मात्र, आकडे पाहून व्हाल निराश; वाचा सविस्तर

हे नक्की पाहा:

क्रिकेटर्सलाही मागे सोडत 'हे' अंपायर कमावतात चिक्कार पैसा | Richest Umpires

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---