क्रिकेटजगतात कित्येक गोलंदाज त्यांच्या अनोख्या गोलंदाजी ऍक्शनसाठी चर्चेत येत असतात. लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराहनंतर मथिशा पथिरानासारखे गोलंदाज आपल्या हटके गोलंदाजी शैलीसह आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरले आहेत. स्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची शैली बऱ्याचदा वेगवेगळी दिसून येते. परंतु वेगवान गोलंदाजांची शैली जवळपास सारखीच असते. यामध्ये मलिंगा, सोहेल तन्वीर आणि बुमराहसारख्या गोलंदाजांची पद्धत जरा वेगळी होती. याच रांगेत आता आणखी एका गोलंदाजाचा समावेश होऊ शकतो.
हिंदी चित्रपट ‘लगान’मधील गोलीप्रमाणे गोलंदाजी करणारा गोलंदाज सध्या चर्चेत आला आहे. त्याचे गोलंदाजी करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असून इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनही त्याची शैली पाहून चकित झाला आहे. हा गोलंदाज चेंडू घेऊन रनअप घेत असताना हात फिरवायला सुरू करतो आणि बऱ्याचदा हात फिरवल्यानंतर चेंडू फेकतो. आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटात ‘गोली’ ही व्यक्तिरेखाही याच शैलीत गोलंदाजी करत होती. ही व्यक्तिरेखा अभिनेता दयाशंकर पांडेने निभावली होती.
Step aside Bumrah, Malinga & Pathirana. Here comes the 🐐 of all bowling actions !!! 🔥🔥😂😂
Cc @faahil @El_Chopernos @elitecynic @cric_archivist #CricketTwitter pic.twitter.com/Zn2AFSPjoB
— Moinak Das (@d_moinak) June 5, 2022
फलंदाज जातो गोंधळून
चेंडू फेकण्यापूर्वी जेव्हा गोलंदाज खूप वेळा त्याचा हात फिरवतो, तेव्हा फलंदाजाला अंदाज लावणे कठीण जाते की, गोलंदाज केव्हा चेंडू सोडेल आणि चेंडू केव्हा त्याच्याजवळ येईल. याखेरीज गोलंदाजाच्या लाईन आणि लेंथचा अंदाज लावणेही कठीण होते. याच कारणामुळे अशा गोलंदाजांचा चेंडू फलंदाजाला पटकन समजत नाही. व्हायरल व्हिडिओत दिसते की, फलंदाजाला त्या गोलंदाजाचा चेंडू समजत नाही आणि तो त्या चेंडूचा सामना करू शकत नाही. यष्टीरक्षकही त्याचा चेंडू व्यवस्थितरित्या पकडू शकत नाही.
Proper action … https://t.co/x1bSx3cXZA
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 6, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
या गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वात आधी मोइनक दास नावाच्या ट्वीटर वापरकर्त्याने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्वीटर वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, तुम्ही बुमराह, मलिंगा आणि पथिरानाची गोलंदाजी विसरून जा. ही सर्वात अनोखी गोलंदाजी शैली आहे.
यानंतर चार्ल्स डगनल नावाच्या एका ट्वीटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ही पूर्णपणे अचूक गोलंदाजी आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
शतक एक विक्रम अनेक! रणजी ट्रॉफीत सरफराजने रचला इतिहास, थेट डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत झाला सामील