श्रीलंका क्रिकेट संघाचा सलामीवीर उपुल थरंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मार्च २०१९ पासून हा फलंदाज आपल्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची वाट पाहात होता. परंतु अद्याप त्याला संधी न मिळाल्याने आज (२३ फेब्रुवारी) त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याने यासंदर्भात ट्विट केले आहे.
एक जुनी म्हण आहे की, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे. वयाची १५ पेक्षा जास्त वर्षे क्रिकेटला दिल्यानंतर आता निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे, असे लिहत त्याने थरंगाने सर्वांना आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे. सोबतच त्याने त्याच्या मित्रांचे, संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि श्रीलंका बोर्डाचे आभार मानले आहे.
https://twitter.com/upultharanga44/status/1364144648063619074?s=20
सन २००५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या थरंगाने २३५ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान १७४ च्या सर्वोच्च धावसंख्येसह त्याने ६९५१ धावा केल्या आहेत. तर या ३६ वर्षीय फलंदाजाने ३१ कसोटी सामन्यात श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान १६५ या सर्वोच्च खेळीसह त्याने १७५४ धावा केल्या आहेत. तसेच २६ टी२० सामन्यात ४०७ धावांची नोंद केली आहे. यादरम्यान त्याने एकूण १८ शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ धाकड फलंदाजांना रिलीज करुन तोंडघशी पडली आरसीबी, एकाने तर केलीत ४ शतके