बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत विषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिषभ पंत आणि उर्वशी यांच्यातील अफेअरच्या चर्चा मागच्या काही महिन्यात चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच उर्वशीने अजून एक प्रतक्रिया देत चाहत्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वशीने स्पष्टीकरण देताना पंतसोबत तिचा काहीही संबंध निसल्याचे स्पष्ट केले आहे.
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिचे नाव मागच्या काही महिन्यांमध्ये पंतसोबत अनेकदा जोडले गेले आहे. या सर्व प्रकरणाची सुरुवात उर्वशीच्या एका मुलाखतीनंतर झाली होती. यावेळी तिने ‘आरपी’ नावाच्या एका व्यक्तिची उल्लेख केला होता आणि चाहते मात्र आरपीला रिषभ पंत (Rishabh Pant) समजून बसले. यावेळी उर्वशीने स्वतः पंत आणि तिच्यातील संबंधाविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
उर्वशीने सांगितले नक्की कोण आहे ‘आरपी’
उर्वशी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “आरपी माझा सहकारी अभिनेता आहे. त्याचे नाव राम पोथिनेनी आहे. मला तर हे माहिती देखील नव्हते की, रिषभ पंतला देखील आरपी म्हणतात. लोकांनी त्यांच्या मानाने अंदाज बांधले आणि याविषयी लिहू लागले. त्यांनी कमीत-कमी याविषयी स्पष्टीकरण देखील दिले पाहिजे. जर कोणी यूट्यूब किंवा इतर कोणत्या माध्यमावर काही बोलत असेल, तर लोक इतक्या सहजासहजी त्यावर विश्वास कसा ठेवू शकतात?”
यापूर्वी उर्वशीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात तिने ‘आरपी’ नाव घेत हा व्यक्ती तिच्या मागे लागला असल्याचे सांगिलते होते. मुलाखतीत उर्वशीने असेही सांगितले होते की, “आरपी मला भेटण्यासाठी उत्सुक होता.” मात्र, तिने या मुलाखतीत ‘आरपी’ म्हणजे नेमका कोण व्यक्ती आहे, याचा खुलासा केला नव्हता. यानंतर चाहत्यांकडून वेगेवगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. उर्वशी आणि पंत दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. (Urvashi Rautela broke silence about her affair with Rishabh Pant)
Urvashi speaking about Rishabh Pant 😅#UrvashiRautela pic.twitter.com/SXPlY85KPl
— Nisha Kashyap (@nishakashyapp) August 9, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढचं बघायच राहील होत ! मैदानात क्रिकेट सोडून रॉक-पेपर-सिझरचा खेळ, कारण ऐकून तुम्हीही डोक्याला लावाल हात
ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे