अमेरिकन कुस्ती संस्था ‘यूएसए रेसलिंग’ ने जाहीर केले आहे ते यावर्षी १२ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपसाठी त्यांचा संघ पाठवणार नाही. ही स्पर्धा सार्बियामधील बेलग्रेड येथे होणार आहे. मात्र कोरोना व्हायरसचा धोका पाहाता अमेरिकेने या स्पर्धेसाठी त्यांचा संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याच्या प्रस्तावाला यूएसए रेसलिंगच्या कार्यकारी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे. कार्यकारी समितीच्या सदस्या वेरोनिका कार्लसन म्हणाल्या, “मला माझ्या खेळाडूंविषयी सहानुभूती आहे, कारण या निर्णयाचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होईल.”
याबरोबर या निर्णयामुळे अमेरिकन कुस्तीपटूंना स्वतंत्रपणे स्पर्धेत सहभागी होण्यापासूनही रोखले जाईल. काही खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी स्वारस्य व्यक्त केलं होतं.
अमेरिकेने विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये सुरक्षेच्या कारणाने सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २००२ मध्ये इराण येथे झालेल्या वरिष्ठ विश्व फ्रिस्टाईल चॅम्पियनशीपमध्येही अमेरिकेने त्यांचा संघ सुरेक्षेच्या कारणाने पाठवला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया