भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाची साध सोडली आहे. भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खास पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ही माहिती दिली गेली आहे. झारखंड संघ सोडल्यानंतर आता तो बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. असे असले तरी, झारखंड संघ सोडताना त्याने मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतल्याचे दिसते.
वरुण एरॉन (Varun Aaron) भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज असला, तरी त्याला देशासाठी जास्त सामने खेळता आले नाहीत. कारकिर्दीतील बराच काळ त्याने दुखापतीला तोंड देण्यात घालवला आहे. झारखंड संघ सोडण्याविषयी चाहत्यांना माहिती देण्यासाठी त्याने सविस्तर पोस्ट लिहिले. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “निरोप घेणे कधीच सोपे नसते, जसे मी झारखंड संघासोबत केले आहे. मागच्या 18 वर्षांमध्ये हा संघ माझे क्रिकेटचे घर राहिला आहे आणि आता मी बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चाललो आहे. बडोदासोबत एका चांगल्या हंगामाची अपेक्षा आहे.”
वरुण एरॉन तेव्हा चांगलाच चर्चेत आला होता, जेव्हा त्याने 2010-11 साली विजय हजारे ट्रॉफीत 153 किलोमीटर ताशी गतीने चेंडू टाकला होता. भारतीय संघासाठी त्याने आतापर्यंत एकूण 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 18 आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 63 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावापुढे 167 विकेट्सची नोंद आहे. लिस्ट ए मध्ये खेळलेल्या 73 सामन्यांमध्ये त्याने 115 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने झारखंड (Jharkhand Cricket Team) संघासाठी शेवटचा सामना 2020 मध्ये महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळला होता. तसेच झारखंड संघासाठी शेवटचा लिस्ट एक सामना 2021 मध्ये हैदराबाद संघाविरुद्ध खेळला होता. सध्या वरुण आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. त्याला आयपीएल 2022 हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात गुजरात संघाने 50 लाल रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. त्यापूर्वी एरॉन दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचे देखील प्रतिनिधित्व केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची गॅरंटी! हॉंगकॉंगही धक्का देण्यास तयार
एका सामन्यामुळे हार्दिकची कमाई थेट ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढली! वाचा सविस्तर
कुमार गट आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा: प्रिन्स, अनुपमा यांना अग्रमानांकन