---Advertisement---

IND vs SA: मिस्ट्री स्पिनचा जलवा! वरुण चक्रवर्तीने रचला नवा इतिहास

On: सोमवार, डिसेंबर 15, 2025 8:59 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथे खेळला गेला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही अपवादात्मक कामगिरी केली. या सामन्यात वरुणने विकेट घेताच त्याने एक खास टप्पा गाठला.

वरुणने या सामन्यात प्रथम डोनोवन फरेराला बाद केला. यासह त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले. त्याने हा विक्रम त्याच्या 32व्या सामन्यात केला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 बळी घेणारा दुसरा सर्वात जलद भारतीय गोलंदाज ठरला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 बळी घेणारा सर्वात जलद भारतीय गोलंदाज म्हणून कुलदीप यादवच्या नावावर आहे. कुलदीपने 30 सामन्यात ही कामगिरी केली

50 टी-20 विकेट्स घेण्यासाठी घेतलेल्या चेंडूंच्या बाबतीत फिरकी गोलंदाजांमध्ये वरूण चक्रवर्ती चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 681 चेंडू घेत 50टी-20 विकेट्स पूर्ण करणाऱ्या इम्रान ताहिरला मागे टाकले. वरुणने 672 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. श्रीलंकेचा माजी लेगस्पिनर अजंथा मेंडिस या यादीत अव्वल आहे. मेंडिसने 600 चेंडूंमध्ये 50 टी-20 विकेट्स पूर्ण केल्या. 638चेंडूंमध्ये ही कामगिरी करणारा कुलदीप यादव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वरूण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 11 धावा देऊन 2 बळी घेतले. हर्षित राणानेही सामन्यात दोन बळी घेतले. शेवटी या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---