सोमवारी (२० सप्टेंबर) आयपीएल २०२१ स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला या सामन्यात अवघ्या ९२ धावा करण्यात यश आले होते.
या सामन्यात ‘मिस्ट्री स्पिनर’ वरूण चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने ज्याप्रकारे ग्लेन मॅक्सवेलला बाद करत माघारी धाडले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. दरम्यान चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या १३ धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चाहत्यांना ग्लेन मॅक्सवेलकडून मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती. परंतु तो असे करू शकला नाही.
आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात ग्लेन मॅक्सवेलने धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे तो दुसऱ्या टप्प्यात देखील हीच कामगिरी करणार अशी आशा होती. परंतु पहिल्याच सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे. तर झाले असे की, १२ वे षटक टाकण्यासाठी चक्रवर्ती गोलंदाजीला आला होता. याच षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू थेट लेग स्टंपला जाऊन धडकला. मॅक्सवेलला या डावात अवघ्या १० धावा करता आल्या.
#VarunChakravarthy #GlennMaxwell #KKRvRCB pic.twitter.com/uKQnNI2gZr
— Shubham Sharma (@Shubham73106588) September 20, 2021
https://twitter.com/RoopamAnurag/status/1439980157838577669?s=20
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
कार्तिकने गाठला धोनी, आरसीबीच्या सलामीवीराला झेलबाद करत ‘या’ विक्रमांत बनला नंबर १
वैर फक्त मैदानात! आरसीबीला चोप दिल्यानंतर अय्यरने ‘रनमशीन’ कोहलीकडून घेतले फलंदाजीचे धडे- VIDEO