इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (29 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता यांच्यात सामना झाला. या सामन्यात युवा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला बाद केले.
भारताचा युवा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचा उत्तम कामगिरीमुळेच त्याची नोव्हेंबर 2020 मध्ये सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात बोल्ड झाला धोनी
चेन्नईला विजयासाठी 33 चेंडूत 51 धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार एमएस धोनी खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. त्याचदरम्यान डावाच्या 15 व्या षटकात फिरकीपटू वरूण चक्रवर्ती गोलंदाजी करायला आला. षटकातील चौथ्या चेंडूवर धोनीने कव्हर वरूण फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतू चेंडू हुकला आणि तो त्रिफळाचित झाला.
या हंगामात याआधीही वरूणने धोनीला केले बाद
या हंगामातील 21 व्या सामन्यात देखील वरूणने धोनीला बाद केले होते. या अटीतटीच्या सामन्यातही धोनी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचित झाला होता.
चेन्नईने मिळवला विजय
गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 172 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने हे लक्ष्य डावाच्या शेवटच्या षटकांत गाठले.
जडेजाने षटकार मारून मिळवला विजय
डावाच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती. कोलकाताचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी शेवटचे षटक फेकायला आला. त्यावेळी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सॅम करन फलंदाजी करत होते. षटकाच्या पहिल्या चार चेंडूवर त्याने फक्त 3 धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी चेन्नईला 2 चेंडूत 7 धावांची गरज होती. जडेजाने दोन्ही चेंडूवर सलग दोन षटकार खेचले आणि संघाला विजय मिळवून दिला.
चेन्नईने शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक 6 वेळा मिळवला विजय
आयपीएलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नईने सर्वाधिक 6 वेळा विजय मिळवला आहे. चेन्नईनंतर मुंबई इंडियन्स (5), राजस्थान रॉयल्स (4) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (3) यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा
धोनीने बटलर, पंड्यां बंधुंनंतर कोलकाताच्या दोन खेळाडूंनाही दिली जर्सी भेट, पाहा फोटो
‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख –