---Advertisement---

दिल्लीच्या या युवकाने असा केला २०१९ चा वर्ल्डकप अविस्मरणीय, पहा व्हिडिओ

---Advertisement---

वर्ल्डकपचे सामने टीव्हीवर पाहण्याचा अनुभव अनेकांसाठी अविस्मरणीय असतो. हेच सामने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहिले तर काय विचारावं?

दिल्लीच्या वासू अगरवाल या युवकालाही यंदाचा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये जाऊन पाहण्याची संधी मिळाली. मैदानावर जाऊन सामने पाहणाऱ्या वासुने एका खास पद्धतीने हा वर्ल्ड कप स्वतःसाठी अविस्मरणीय केला.

2019 वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यातील खास क्षणाचे रेखाटन वासुने आपल्या स्केचबुकमध्ये केले. नुकताच त्याने ह्या स्केचेसचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला.

त्याने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘इंग्लंडमधील 2019 चा क्रिकेट वर्ल्डकप माझ्या आयुष्यातील सर्वात आवडत्या घटनांपैकी एक ठरला. आवडत्या देशात आवडता खेळ माझ्या काही आवडत्या व्यक्तींबरोबर पहायला मिळाला. ही स्केचबूक, या स्पर्धेतील काही खास क्षण जसे झाले तसे उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.’

वासू मेकॅनिकल इंजिनियर असून त्याने प्रॉडक्ट डिझाईनमध्येदेखील पदवी घेतली आहे. सध्या तो एका कंपनीत डिझायनर म्हणून काम करतो.

https://www.instagram.com/p/B2Q1wXoH2EN/

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाचव्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली संधी

शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ; या मोठ्या खेळाडूला वगळले

विराट-रोहित वादाबद्दल कोच रवी शास्त्रींनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment