भारत देश सध्या कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सध्या केवळ सामान्य जनताच नाही तर अनेक सेलिब्रेटी, खेळाडू त्यांचे कुटुंबिय देखील अडकले आहेत. नुकतेच असे वृत्त येत आहे की भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीच्या बहिणीचे कोरोनामुळे गुरुवारी (६ मे) निधन झाले आहे.
त्यामुळे वेदाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण साधारण २ आठवड्यांपूर्वीच तिच्या आईचे कोरोनामुळेच निधन झाले होते. मागील महिन्यात वेदाची आई आणि बहिण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी झाली होती.
मागील महिन्यात २४ एप्रिल रोजी तिने तिच्या आईच्या निधनाबद्दल ट्विटवरुन सर्वांना माहिती दिली होती. तसेच तिचा स्वत:चा अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर या कठीण काळाचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी तिने सहानुभीती दर्शवली होती. याबरोबरच तिने तिच्या बहिणीसाठी आता सर्वजण प्रार्थना करत असल्याचेही तिने सांगितले होते. त्यावेळी तिची बहिण कोरोना विरुद्ध लढा देत होती. पण अखेर तिच्या बहिणीचेही गुरुवारी निधन झाले.
तिच्या बहिणीची दु:खद बातमी वेदाचे प्रशिक्षक इरफान सैत यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत दिली आहे.
https://twitter.com/vedakmurthy08/status/1385970047978393600
सध्या भारतात कोरोना व्हायरसची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. रोज लाखांमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यातच वैद्यकिय सुविधांचाही आभाव जाणवत आहे. त्यामुळे जगभरातून भारतासाठी प्रार्थान केली जात आहे.
वेदाची कामगिरी
वेदाही भारतीय महिला संघाची नियमित सदस्य आहे. तिने २०११ साली भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत ४८ वनडे आणि ७६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये तिने ८२९ धावा केल्या. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तिने ८७५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी…”, जॉस बटलरचा आयपीएल सोडताना भावूक संदेश
मॅन ऑन मिशन! आयपीएल स्थगित झाल्यानंतर विराटने कोरोनाच्या काळात ‘हे’ महत्वाचे कार्य घेतले हाती
धोनीचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय! सगळे खेळाडू घरी सुरक्षित परतल्यावर मगच जाणार रांचीला






