बुधवारी विराट कोहली याच्या नेतृत्वाती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आपल्या होम ग्राऊंडवर पराभूत झाला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरने 21 धांवांनी आरसीबीला मात दिली. नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस ऐवजी विराट हंगामातील सगल तिसऱ्या सामन्यात नेतृत्व करताना दिसला. वरुण चक्रवर्ती सामनावीर ठरला. विराटचे वैयक्तिक प्रदर्शन देखील जबरदस्त राहिले. मात्र वेंकटेश अय्यरने एक अप्रतिम झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
विराट कोहली (Virat Kohli) याने केकेआरविरुद्धच्या या सामन्यात 37 चेंडूत 54 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार देखील मारले आणि 145.94 हा त्याचा स्ट्राईक रेट होता. आरसीबीला विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य मिळाले होते. विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी आला असून त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. विराटने आरसीबीला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार असे वाटत अशतानाच 12व्या षटकात त्याने विकेट गमावली.
या षटकात केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसल गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर विराटने डीप मीडविकेटच्या दिशने एक उत्कृष्ट शॉट खेळला. मात्र विराटने मारलेला हा शॉट त्याठिकाणी उफा असलेल्या वेंकटेश अय्यरने जराही चूक न करता झेलला. परिणामी संघाची धावसंख्या 115 असताना आरसीलीला विराटच्या रूपात पाचवी विकेट गमवावी लागली. हा अप्रतिम झेल घेतल्यानंतर वेंकटेश अय्यरचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. आयपीएळच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
He held his nerves, remained composed and grabbed a spectacular catch 👌👌
Hear from @venkateshiyer on that catch of Virat Kohli which changed the momentum of the game 🙌🏻#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/rMtHoIobpQ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक विराटने जिंकली होती आणि केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर आरसीबीने 20 षटकात 5 बाद 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 20 षटकांमध्ये 8 बाद 179 धावांची खेळी केली. सामनावीर ठरलेल्या वरुण चक्रवर्तीने केकेआरसाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. सुयश शर्मा आणि आंद्रे रसल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. (Venkatesh Iyer took an amazing catch to dismiss Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयकडून 17 महिला क्रिकेटपटू करारबद्द, ‘या’ तिघींचा ‘अ’ श्रेणीत समावेश
धोनीला विरोधी संघाकडूनही मिळतोय तुफान पाठिंबा; राजस्थानचा खेळाडू म्हणाला, ‘आता तो मैदानात असूनही…’