भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सलग दुसरा टी20 सामना पराभूत झाला. यजमान वेस्ट इंडिजने 5 टी20 सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारत संघाच्या या निराशाजनक कामगीरीमुळे क्रिकेट चाहते नाराज होऊन प्रतिक्रिया देत आहे. सोबतच भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देत आहेत. यातच भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे.
दोन्ही टी20 सामन्यामध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला. प्रसाद यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “कसोटी क्रिकेट वगळता, वनडे आणि टी20 मध्ये भारताची कामगिरी फारच सामान्य आहे. भारताने बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका गमावली. गेल्या दोन टी20 विश्वचषकातही संघाने सुमार कामगिरी केली. भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे आक्रमक आणि बुद्धिमान क्रिकेट खेळत नाही.”
दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवाविषयी प्रसादांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “ही खूपच साधारन प्रदर्शन होती. या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 2007 चा विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर आयपीएलची सुरवात झाली. तेव्हापासून भारताने एकदाही विश्वचषक जिंकला नाही. यात भारतीय संघ केवळ एकदाच अंतिम फेरीत गेला. मात्र, संघाला त्या वेळीही पराभव स्वीकारावा लागला.”
त्यांनी पुढे लिहले, “वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 मध्ये युझवेंद्र चहलने 16 व्या षटकात 2 बळी घेतले, त्यानंतर भारतीय संघाने विकेट घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. चहलने आपल्या संघाला सामन्यात परत आणले. चहलचे ते तिसरे षटक होते आणि विंडीजच्या 8 विकेट पडल्या होत्या. एका षटकात दोन विकेट घेतल्यानंतर चहलला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली नाही. वेस्ट इंडिजच्या 9आणि 10व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलंदाजांचा चांगले प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला. केवळ कागदावर योजना करून काहीही होणार नाही. टीम इंडियाची विचारसरणीही स्मार्ट असावी,” असे वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले. (venkatesh prasad angry statment on team india after india loss his 2nd t20)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
“टीम इंडियाला शिखरची गरज”, विश्वचषकासाठी संघात समाविष्ट करण्याची दिग्गजाची मागणी