---Advertisement---

युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 2:58 PM
U19-Team-India
---Advertisement---

यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ चे (U19 World Cup) विजेतेपद जिंकले. भारताच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. संघाचा उपकर्णधार शेख रशीद (Shaikh Rasheed) यानेसुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे यंदा १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात (IPL 2022 Auction) या विश्वचषकातील खेळाडूंवर मोठी बोली लागेल, अशी चर्चा आहे. मात्र, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शेख रशीद या लिलावात भाग घेणार नाही.

शेख रशीद म्हणाला की, “मी यावर नाराज नाही. नक्कीच नाही, मला माझ्या संधी मिळतील. जर मी या वर्षी खेळलो नाही, तर याचा अर्थ माझ्या खेळाचा अंत झाला, असे नाही. मी पूढे जाऊन पात्र ठरेन.”

आयपीएल लिलावात समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला अ दर्जाचा किंवा प्रथम श्रेणी सामना खेळणे आवश्यक आहे. राशिदने आतापर्यंत अ दर्जाचे आणि प्रथम श्रेणी हे दोन्ही सामने खेळले नाहीत. त्यामुळे त्याला या आयपीएल लिलावात संधी मिळणार नाही. पुढच्या आयपीएल लिलावापर्यंत रशीदने जर अ दर्जाचे आणि प्रथम श्रेणी सामने खेळले असतील, तर आयपीएल २०२३ च्या लिलावात तो सहभागी होऊ शकेल.  

१९ वर्षाखालील विश्वचषकातील तीनही बाद फेरीच्या सामन्यामध्ये रशीदने क्रीजवर जोरदार फलंदाजी केली. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशविरुद्धचा सामना कमी धावसंख्येचा होता, पण लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ९४ धावांची खेळी केली आणि इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ५० धावा केल्या. तिन्ही वेळा भारताची पहिली विकेट लवकर पडली. यानंतर रशीदने शानदार फलंदाजी केली.

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिलाच सामना खेळला आणि संघावार कोरोना संकट आले. शेख रशीदसोबतच संघातील पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाच्या हल्ल्यानंतर रशीदने आत्मविश्वासाला तडा न जाऊ देता, पुनरागमन करत शानदार कामगिरी केली.

आयपीएल २०२२ चा मेगा लिलावात सहभागी होणाऱ्या ५९० खेळाडूंपैकी ३७० भारतीय आहेत. यावर्षी लिलावत १० संघाचा समावेश असेल. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये मेगा लिलाव पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय क्रिकेटरचे ५ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल म्हणतोय…

गांगुलीच्या इच्छेला हार्दिककडून बगल? रणजी स्पर्धेबाबत घेतला मोठा निर्णय

“मी त्यांना लताजी म्हटले, तर त्यांनी मला ‘आई’…” शोएब अख्तरने दिली भावनिक श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---