सध्या देशभरात विविध शहरांमध्ये रणजी ट्रॉफी 2022-2023 या सर्वात मोठ्या प्रथमश्रेणी स्पर्धेचा हंगाम खेळला जातो. शुक्रवारी ( 20 जानेवारी) एलिट डी गटातील सामना विदर्भ विरुद्ध गुजरात असा समाप्त झाला. रणजी ट्रॉफी इतिहासात नोंद झालेल्या या सामन्यात विदर्भाने केवळ 73 धावांचा बचाव करत 18 धावांनी सामना खिशात घातला. फिरकीपटू आदित्य सरवटे विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार राहिला.
नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात विदर्भ संघासाठी पहिला डाव नामुष्कीजनक राहिला. गुजरातच्या चिंतन गजा व तेजस पटेल या गोलंदाजांनी प्रत्येकी पाच बळी मिळवत विदर्भाचा पहिला डाव केवळ 74 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर, गुजरातने आपल्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना 256 धावा उभ्या केल्या. युवा आर्य पटेलने सर्वाधिक 88 धावांचे योगदान दिले. तर, विदर्भासाठी आदित्य सरवटेने पाच बळी घेण्याची कामगिरी करून दाखवली.
Vidarbha defended the lowest total in the history of the Ranji Trophy 👏#GUJvsVID #RanjiTrophy #Cricket pic.twitter.com/F8t9FVouVy
— Wisden India (@WisdenIndia) January 19, 2023
विदर्भाच्या दुसऱ्या डावात मात्र यष्टीरक्षक जितेश शर्मा याने आक्रमक खेळ दाखवताना केवळ 53 चेंडूंवर 68 धावा कुटल्या. त्याला नचिकेत भुटे याने 42 धावा करत साथ दिली. यासह विदर्भाचा दुसरा डाव 254 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे गुजरात संघासमोर विजयासाठी केवळ 73 धावांचे आव्हान राहिले. मात्र, हे आव्हान डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे याने हिमालयाएवढे मोठे केले. आदित्यने सहा तर युवा हर्ष दुबे याने तीन बळी मिळवत गुजरातचा डाव केवळ 54 धावांवर संपुष्टात आणत विक्रमी विजय नोंदवला.
धावांचा बचाव करताना रणजी ट्रॉफी इतिहासातील हा विक्रमी विजय ठरला. यापूर्वी 1949 मध्ये बिहारने दिल्लीला 78 धावांचे लक्ष पार करू दिले नव्हते. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रेल्वेने 2017 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध 94 भावांचा बचाव करताना विजय साजरा केलेला.
(Vidarbha defended the lowest total 73 in the history of the Ranji Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंत फक्त उपस्थित असला तरी…’, दिल्लीच्या प्रशिक्षकांकडून दुखापतग्रस्त यष्टीरक्षकाला मैदानात आमंत्रण
आयपीएल क्रश काव्या मारनची जादू दक्षिण आफ्रिकेतही चालली, लाईव्ह सामन्यात आली लग्नासाठी मागणी