रणजी ट्रॉफी 2018-19च्या उपांत्य सामन्यात विदर्भाने केरळवर एक डाव आणि 11 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विदर्भाने मागील वर्षीही अंतिम फेरीत प्रवेश करत विजेतेपद पटकावले होते.
यावर्षी केरळ विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उमेश यादवने चमकदार कामगिरी करत दोन्ही डावात मिळून 12 विकेट्स घेतले आहेत. त्याने केरळ विरुद्धच्या पहिल्या डावात 48 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 31 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पूर्वी विदर्भाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय अचूक ठरवत केरळला पहिल्या डावात 106 धावांवरच रोखले. तर विदर्भाने कर्णधार फैज फजलने केलेल्या 75 धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 208 धावा केल्या आणि 102 धावांची भक्कम आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावातही यादवच्या गोलंदाजीसमोर केरळच्या फलंदाजांची सळो की पळो अवस्था झाली होती. त्याला यश ठाकुरने योग्य साथ देत 4 विकेट्स पटकावल्या. या दोघांच्या गोलंदाजीसमोर केरळला सर्वबाद 91 धावाच करता आल्या.
या सामन्यात विदर्भाचा स्फोटक फलंदाज वसीम जाफरने 34 धावा करत या हंगामात 1000 धावांचा टप्पा गाठला. तो रणजी ट्रॉफीच्या दोन हंगामात प्रत्येकी 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने 2008-09च्या हंगामात मुंबईकडून खेळताना 1260 धावा केल्या होत्या. ह्या धावा त्याने 16 डावांमध्ये 84च्या सरासरीने पूर्ण केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक:
केरळ पहिला डाव – सर्वबाद 106 धावा
विदर्भ पहिला डाव – सर्वबाद 208 धावा
केरळ दुसरा डाव – सर्वबाद 91 धावा
सामनावीर – उमेश यादव(12 विकेट्स)
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
–सिद्धार्थ देसाईंच्या जागी या खेळाडूला संधी, असा असेल महाराष्ट्र संघ.
–हार्दिक पंड्या होणार टीम इंडियात सामील, तर राहुललाही मिळाले या संघात स्थान