क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे म्हटले जाते. कारण, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोणाच्या पारड्यात जाईल, याचा काही नेम नसतो. यादरम्यान चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. मात्र, याचेही बरेच नियम असतात. जर चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला, तर तो षटकार घोषित केला जातो. पंचही 6 धावांचा इशारा करतात. प्रत्येक सामन्यात असेच काहीसे पाहायला मिळते, परंतु यावेळी जरा वेगळेच दृश्य पाहायला मिळाले आहे. बिग बॅश लीग स्पर्धेच्या एका सामन्यात छत असणाऱ्या स्टेडिअममध्ये एक विचित्र निर्णय घेण्यात आला.
मेलबर्नच्या डॉकलँड्स स्टेडिअममध्ये मैदानाच्या वरही छत आहे. या मैदानावर मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स (Melbourne Renegades vs Melbourne Stars) संघात बीबीएलचा 41 वा सामना खेळला गेला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सचा फलंदाज जो क्लार्क (Joe Clarke) याने जोरात शॉट मारला असता, तो चेंडू थेट छताला जाऊन धडकतो आणि पंच फलंदाजाच्या खात्यात 6 धावा जोडण्याचा इशारा करतात. म्हणजेच ते या शॉटला षटकार घोषित करतात. कारण, या स्टेडिअमसाठी वेगळा नियम बनवण्यात गेला आहे.
जो क्लार्कने भिरकावला गगनचुंबी शॉट
बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत मेलबर्न स्टार्सकडून खेळताना फलंदाज जो क्लार्क याने मेलबर्न रेनेगेड्सचा गोलंदाज विल सदरलँड टाकत असलेला चेंडू हवेत भिरकावला. हा चेंडू खूपच उंचीवर जाऊन मैदानातील छताला धडकला आणि पुन्हा मैदानावर येऊन पडला. असे म्हटले जात होते की, हा चेंडू ‘डेड बॉल’ असेल, परंतु असे काहीच झाले नाही. पंचांनी 6 धावांचा इशारा करत दोन्ही हात वर केले. त्यामुळे क्लार्कच्या खात्यात षटकाराची नोंद झाली. हा हैराण करणारा निर्णय होता, परंतु नियमांमुळे पंचांनी हा निर्णय घेतला होता.
IT'S HIT THE ROOF!!!
Lucky or not, it's 6️⃣ in the book! #BBL12 | @BKTtires | #GoldenMoment pic.twitter.com/Y7AJJDxmNf
— cricket.com.au (@cricketcomau) January 14, 2023
काय आहे नियम?
बिग बॅश लीगमध्ये डॉकलँड्स स्टेडिअमसाठी एक वेगळाच नियम बनवण्यात आला आहे. संपूर्ण स्टेडिअम छताने झाकले गेलेले आहे. त्यामुळे जर कोणत्याही फलंदाजाचा शॉट छताला जाऊन धडकला, तर त्याला षटकार घोषित केले जाते. साधारणत: असे दिसते की, मैदानावरून जाणाऱ्या स्पायडर कॅमेऱ्याला कोणताही चेंडू धडकला, तर त्या चेंडूला ‘डेड बॉल’ घोषित दिले जाते. मात्र, इथे असे नाहीये. या स्टेडिअममध्ये फक्त बीबीएलच्या सामन्यांवेळीच हा नियम लागू होतो.
हा नियम का बनवण्यात आला?
बिग बॅश लीगमध्ये डॉकलँड्स स्टेडिअमसाठी हा नियम एका कारणामुळे बनवण्यात आला होता. यापूर्वी या मैदानातील छताला चेंडू लागल्यावर ‘डेड बॉल’ घोषित केले जायचे. एका रिपोर्टनुसार, 2012मध्ये ऍरॉन फिंचचा एक मोठा शॉट स्टेडिअमच्या छताला लागला होता आणि चेंडूला ‘डेड बॉल’ घोषित केले गेले होते. यानंतर चाहतेही भलतेच नाराज झाले होते. तसेच, त्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. तिथूनच हा नियम बदलत, ‘डेड बॉल’च्या ऐवजी छताला लागणाऱ्या चेंडूला षटकार दिले जाऊ लागले. यापूर्वीही 2018मध्ये असेच काहीसे घडले होते. ऍश्टन टर्नर याने डॅन ख्रिस्तियनच्या चेंडूवर मोठा शॉट ठोकला होता, जो स्टेडिअमच्या छताला लागला होता आणि फलंदाजाला सहा धावा मिळाल्या होत्या. (video from bbl 12 match umpire gives six after ball hitting the roof of stadium see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे स्वरुप बदणार बीसीसीआयने केले स्पष्ट! कधी आणि कोणता बदल होणार घ्या जाणून
केएल राहुलच्या लग्नाला उपस्थित नसतील भारतीय खेळाडू, पण संघ मोठी भेट देण्याच्या तयारीत