---Advertisement---

मुझसे शादी करोगे? लाईव्ह टीव्ही शोमध्ये चाहतीची क्रिकेटरला लग्नाची मागणी, उत्तर जाणून घ्या

On: शुक्रवार, मे 13, 2022 7:19 PM
---Advertisement---

जगभरात क्रिकेट या खेळाचा चाहतावर्ग मोठा आहे. हेच चाहते बऱ्याचदा त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंकडे आगळ्यावेगळ्या मागण्या करताना दिसतात. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याला तर एका मुलीने लाईव्ह टीव्ही शोमध्ये चक्क लग्नासाठी मागणी घातली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

लाईव्ह टीव्ही शोमध्ये पाकिस्तानचा २६ वर्षीय सलामीवीर इमामला (Imam Ul Haq) एका मुलीने लग्नासाठी प्रपोज केले. हे ऐकून काही मिनिटांसाठी इमाम अवाक् झाला. मात्र त्यानंतर तो खदखदून हसू लागला, तसेच त्याने त्या मुलीच्या मागणीवर आपले उत्तरही दिले.

इमाम जिओ न्यूजच्या ‘हसना मना है’ या कार्यक्रमात गेला होता. या कार्यक्रमादरम्यान दर्शकांमध्ये बसलेल्या एका मुलीने इमामला प्रपोज करत (Girl Proposed Imam Ul Haq) म्हटले की, ‘तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल?’. यानंतर इमामच्या चेहऱ्यावर मोठे हास्य खुलले. तो म्हणाला की, ‘मी काय म्हणू शकतो?’ यावर पुन्हा ती मुलगी म्हणाली की, ‘कृपया, नकार देऊ नका. माझी अब्रू राखा.’ यानंतर इमाम हसत तिला म्हणतो की, ‘त्यासाठी तुला माझ्या आईकडे जावे लागेल. याचे उत्तर ती अजून व्यवस्थित देऊ शकते.’ इमामने असे म्हणताच ती मुलगी म्हणते की, ‘तुम्ही आधी होकार तरी द्या. मग मी कोणालाही बोलेल.’

या गमतीशीर प्रसंगानंतर दर्शकांमध्ये हशा पिकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.

https://twitter.com/cricketroom_/status/1524705911264186370?s=20&t=aDMxmOPXW8UefnGWcMLq4w

दरम्यान यापूर्वी इमामने लग्नाच्या प्रश्नावर आपले उत्तर दिले होते. आताच लग्न करण्याची आपली मनिषा नसल्याचे त्याने सांगितले होते. इमाम म्हणाला होता की, मी अजूनतरी लग्नाचा विचार करत नाहीय. कदाचित अजून १ किंवा दीड वर्षांनंतर मी लग्न करेल. कारण सध्या मला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आधी बाबर आझम लग्न करेल. मग मी त्यानंतर लग्नाचा विचार करेल. इमाम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हक यांचा भाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: मुंबईपुढे फक्त ९७ धावांवर चेन्नई गारद, युवराजने रैनाला केले ट्रोल; स्टार फलंदाजाचाही Epic रिप्लाय

मूर्ती लहान कीर्ती महान! जेमतेम ३३ हजार लोकसंख्या असलेल्या देशाने टी२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास

युवा आहे, पण छावा आहे! सीएसकेची धुलाई करत तिलक वर्माने मोडला पंतचा ५ वर्षे जुना विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---