मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी (१२ मे) आयपीएल २०२२चा ५९वा सामना झाला. मुंबई आणि चेन्नईने चालू हंगामात आमने सामने येण्याची ही दुसरी वेळ होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला केवळ ९७ धावा करता आल्या. चेन्नईच्या नाममात्र ९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने १४.३ षटकातच ५ विकेट्सच्या नुकसानावर सामना खिशात घातला.
यासह चेन्नई संघाच्या (MI vs CSK) प्लेऑफमध्ये जाण्याच्या अपेक्षा संपुष्टात आल्या. चेन्नईने मुंबईविरुद्ध स्विकारलेल्या या दारुण पराभवामागचे कारण ठरली त्यांची फलंदाजी. चेन्नईचा संघ ९७ धावांवरच सर्वबाद (CSK All Out On 97) झाल्यानंतर माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याला ट्रोल केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या एल क्लासिको सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. परंतु चेन्नई संघाकडून कर्णधार एमएस धोनीला वगळता इतर कोणालाही अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. चेन्नई संघाकडून कर्णधार धोनी (MS Dhoni) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारांची बरसात केली. धोनीव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही.
मागील सामन्यात वादळी खेळी करणारा डेवॉन कॉनवे आणि मोईन अली हे फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले. याव्यतिरिक्त महीश तीक्षणाही शून्यावर बाद झाला. दुसरीकडे, ड्वेन ब्रावोने १२, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. मात्र, या खेळाडूंना आपल्या संघाला १०० धावांचा आकडा पार करून देता आला नाही.
When Yuvraj Singh made fun of CSK in front of Raina!????????????#CSK #MI #fun #IPL2022 #IPL @YUVSTRONG12 @ImRaina pic.twitter.com/vzVWbnKHDp
— VivekThakur (@thakur_vivek00) May 12, 2022
चेन्नईच्या या निराशाजनक फलंदाजी प्रदर्शनानंतर युवराज रैनाची मजा (Yuvraj Singh Trolls Suresh raina) घेताना दिसला. युवराज म्हणतो की, “रैना तुझा संघ आज ९७ धावांवरच सर्वबाद झालाय. यावर तू काय म्हणू इच्छितोस.” असे म्हणताना युवराजला हसू फुटते.
युवराजच्या या प्रश्नावर रैनाही मजेशीर उत्तर देतो. “मी त्या सामन्यात नव्हतो”, असे उत्तर रैना युवराजच्या प्रश्नावर देतो. या दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
युवा आहे, पण छावा आहे! सीएसकेची धुलाई करत तिलक वर्माने मोडला पंतचा ५ वर्षे जुना विक्रम
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून
लॅब्यूशेनचा शॉर्ट बॉल झेलू शकला नाही स्टोक्स, धापकन मैदानावर कोसळला इंग्लंडचा नवा कर्णधार