विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीट मिळवणारा संघ बनण्याचा मान भारताला मिळाला. भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंका संघाचा 302 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी, दोन्ही विभागाने जबरदस्त प्रदर्शन केले. खासकरून मागील काही सामन्यांपासून फ्लॉप ठरत असलेला श्रेयस अय्यर या सामन्यात चमकला. त्याच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र, सामन्यानंतर पत्रकाराने जेव्हा त्याला शॉर्ट चेंडूविषयी (आखुड टप्प्याचा चेंडू) प्रश्न विचारला, तेव्हा श्रेयस अय्यर संतापला. आता यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पत्रकारावर संतापला श्रेयस अय्यर
सामन्यानंतर एका पत्रकाराने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Journalist) याला शॉर्ट चेंडूविषयी (Short Ball) प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अय्यर म्हणाला, “तुम्ही म्हणता माझ्यासाठी ही समस्या आहे, तेव्हा तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे?” पुढे बोलत अय्यर म्हणाला, “मी किती पुल शॉट मारले, हे तुम्ही पाहिलं का? खासकरून ते चेंडू, ज्यावर चौकार आला आहे. जर तुम्ही कोणत्याही चेंडूला मारण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमचे बाद होणे निश्चित आहे. मग तो शॉर्ट चेंडू असो किंवा ओव्हरपीच चेंडू असो. मी जर तीन वेळा बाद झालो, तर तुम्ही सर्वजण म्हणाल, ‘हा इनस्विंग खेळू शकत नाही, जर चेंडू वेगाने येत असेल, तर तो कट खेळू शकत नाही.'”
https://twitter.com/shawstopper_100/status/1720126824502489336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1720126824502489336%7Ctwgr%5E76725f35f9cba26a887ba0b39934d8d1826caf95%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-shreyas-iyer-lost-his-cool-in-the-press-conference-on-short-ball-question-here-you-see-video-india-vs-sri-lanka-match-world-cup-2023-8929386.html
अय्यरनुसार, शॉर्ट चेंडूविरुद्ध तो कमकुवत असल्याचे माध्यमांनीच पसरवले आहे. तो म्हणाला, “खेळाडू म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर बाद होऊ शकतो. तुम्ही लोकांनीच बाहेर असा माहोल बनवलाय की, ‘तो शॉर्ट चेंडू खेळू शकत नाही’ आणि मला वाटते की, लोक हेच सतत लावून धरत आहेत आणि सातत्याने हेच तुमच्या डोक्यात चालत राहते. तसेच, तुम्ही यावरच काम करत राहता.”
मुंबईत खेळण्याविषयी तो म्हणाला, “मी मुंबईतून येतो आणि वानखेडेच्या खेळपट्टीवर मी खूप खेळलो आहे, जिथे भारताच्या इतर मैदानांच्या तुलनेत जास्त उसळी चेंडू पाहायला मिळतात. मी अधिकतर सामने इथे खेळलो आहे आणि त्यामुळे मला चांगलेच माहितीये की, उसळी चेंडूंचा सामना कसा करायचा आहे. जेव्हा तुम्ही उसळी चेंडू मारण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही बादही होऊ शकता. कधीकधी हे तुमच्या बाजूनेही जाते. असे होऊ शकते की, मी जेव्हा असा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा अधिकतर बाद झालो आहे. त्यामुळे तुम्ही विचार करता की, ही माझ्यासाठी समस्या आहे.”
श्रेयसची बॅट तळपली
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ 357 धावांचे आव्हान उभारण्यात श्रेयस अय्यर याचे मोलाचे योगदान राहिले. त्याने 56 चेंडूत 82 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. यापूर्वी अय्यरबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते की, तो चौथ्या क्रमांकावर व्यवस्थित खेळू शकत नाही. कारण, त्यापूर्वी अय्यर सातत्याने शॉर्ट चेंडूवर बाद होत होता. मात्र, या सामन्यात अय्यरचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. त्याने टीकाकारांची बोलती बंद केली. (video indian cricketer shreyas iyer lost his control icc odi world cup 2023 ind vs sl )
हेही वाचा-
‘कोहली को बॉल दो’, चालू सामन्यात विराटकडे चाहत्यांची डिमांड, दिग्गजाच्या अंदाजाने जिंकले मन- Video
ना विराट, ना शमी, रोहितने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलं की…’