भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिथून संघासह परतू शकला नव्हता. युजवेंद्र कोरोनामधून बरा होऊन आता घरी परतला आहे आणि सध्या तो मुंबईत आहे. त्याची पत्नी धनश्री वर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओमध्ये युजवेंद्र, त्याची सासू आणि पत्नी धनश्रीही दिसत आहेत. तिघेही एकत्र नाचत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CSTUJOXoTDn/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत.
युजवेंद्र चहलने श्रीलंका दौऱ्यावर दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली, तर दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान तो विलगीकरणात होता.
पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर, कृणाल पांड्या कोविड-१९ चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर चहलला त्याच्या जवळच्या संपर्कामुळे उर्वरित दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधूनही वगळण्यात आले. टी-२० मालिकेनंतर, चहलचा कोविड-१९ चाचणीचा अहवालही सकारात्मक आढळला. युजवेंद्र आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना घरी परतण्यास विलंब झाला.
या दौऱ्यात चहलने दोन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला आणि चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, दुसऱ्या टी-२० च्या पूर्वी अष्टपैलू कुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या क्रिकेटपटूंना वेगळे केले गेले. यानंतर, संघ घरी परतण्याच्या अगदी आधी चहल आणि गौतम पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्याला श्रीलंकेत राहावे लागले होते.
युजवेंद्र चहल आता सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाणार आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल. अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यजमान यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ENG vs IND 1st Test: नॉटिंघम कसोटी अनिर्णित; पावसामुळे अखेरचा दिवसाचा खेळ झाला रद्द
-नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट संघाने केली ‘ही’ गोष्ट; ‘बुम बुम बुमराह’चे वक्तव्य
-भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ‘त्या’ गोष्टींचा सर्वाधिक फायदा झाला, जो रुटचा खुलासा






