क्रिकेट या खेळात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे महत्त्वाचे विभाग आहेत, हे सर्वांनाच माहितीये. यातील एकाही विभागात संघाने चूक केली, तर त्याचे परिणाम सामन्यावर झाल्याशिवाय राहत नाहीत. क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना चित्त्याची चपळाई दाखवावी लागते, पण अनेकदा स्टार खेळाडूही क्षेत्ररक्षण करताना चुकतात. काही खेळाडूंचे क्षेत्ररक्षण पाहून आपसुकच तोंडातून ‘किती खराब क्षेत्ररक्षण आहे’ असं निघतं. असंच म्हणायला भाग पाडणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटमधील आहे, जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फलंदाजाने धावत पूर्ण केल्या 3 धावा
खराब क्षेत्ररक्षण (Poor Fielding) केल्याचा हा नजारा ईसीएस स्वीडन सामन्यातल क्रिस्टियानस्टेड विरुद्ध हम्मार्बी (Kristianstad vs Hammarby) संघात झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. हम्मार्बी संघाचा फलंदाज हुमेज जावेद (Humaiz Javed) 24 चेंडूत 47 धावांवर खेळत होता. दहा षटकांच्या या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर त्याने चेंडू कव्हर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मारला आणि सोपी धाव पूर्ण केली.
यावेळी क्षेत्ररक्षकाने चेंडू वेगाने पकडला आणि क्षेत्ररक्षकाकडे फेकला. मात्र, तोपर्यंत नॉन-स्ट्रायकर बाजूने जावेदने दुसरी धावही पूर्ण केली होती. यावेळी यष्टीरक्षक चेंडू हातात घेऊन धावला आणि नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या गोलंदाजाकडे चेंडू फेकला. मात्र, हा चेंडू पकडण्यात तो अपयशी ठरला.
When you’re on 47 and it’s the last ball of the day…#EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/khNawQY4pU
— European Cricket (@EuropeanCricket) June 16, 2023
या खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही फलंदाजांनी तीन धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे जावेदने जिथे एक धाव मिळणार होती, तिथे 3 धावा घेऊन अर्धशतक पूर्ण केले. मात्र, या सामन्यात हम्मार्बी संघाला 49 धावांनी पराभूत व्हावे लागले. क्रिस्टियानस्टेड संघाकडून समिउलहक गुजेर (Samiulhaq Gujer) चमकला. त्याने अवघ्या 23 चेंडूत नाबाद 81 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि 9 षटकारांची बरसात केली. असे असले, तरीही जगभरात या खराब क्षेत्ररक्षणाची चर्चा रंगली आहे. (video poor fielding display as batter reaches 50 european cricket series see here)
महत्वाच्या बातम्या-
‘मला नाही आवडलं…’, स्टोक्सने पहिल्या दिवशी डाव घोषित करताच संतापले इंग्लंडचे 2 दिग्गज कर्णधार
मोठी बातमी! ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये झळकणार ‘हा’ भारतीय क्रिकेटर, 8 वर्षे केलंय देशाचं प्रतिनिधित्व