आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. या महत्वपूर्ण सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघ मैदानावर सराव करण्यास पोहोचला, तेव्हाच भारताचा स्टार फलंदाज दुखापतग्रस्त झाला. आता त्याची ही दुखापत किती गंभीर हे लवकरच कळेल.
या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) नेटमध्ये सराव करताना दुखापतग्रस्त झाला. त्याला हर्षल पटेल (Harshal Patel) याच्या गोलंदाजीवर दुखापत झाली. ज्याक्षणी हर्षलचा चेंडू विराटच्या मांडीला लागला तेव्हा तो काही वेळासाठी मैदानावर बसला आणि त्यानंतर तो नेटमधून बाहेर झाला. तरीही भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब नाही कारण काही वेळातच तो ठिक होत नेटमध्ये आला. त्याने चाहत्यांसोबत सेल्फीही काढल्या.
Scary moment for Virat Kohli, Harshal Patel ball hit him in the nets. https://t.co/iIUyit9XgL
— Aru ★ (@Aru_Ro45) November 9, 2022
या स्पर्धेत विराट भारतासाठी एक्स फॅक्टर ठरत आहे. त्याने या स्पर्धेच्या चालू हंगामात 5 सामन्यात खेळताना 3 नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. ज्यामुळे त्याने 123च्या सरासरीने 246 धावा केल्या. याबरोबर तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने या पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली, जी त्याची या स्पर्धेतील सर्वोच्च आणि सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने नेदरलॅंड्स विरुद्ध नाबाद 62 आणि बांगलादेश विरुद्ध नाबाद 64 धावा केल्या.
विराट टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 26 सामन्यात 1091 धावा केल्या आहेत. तसेच त्याची ओव्हल मैदानावरची आकडेवारीही जबरदस्त आहे. त्याने या मैदानावर आतापर्यंत दोन टी20 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केल्या आहेत. ते दोन्ही सामने भारताने जिंकले. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला. 2016च्या या सामन्यात विराटने नाबाद 90 धावा केल्या. दुसरा सामना याच स्पर्धेत बांगलादेशविरुद्धचा आहे.
इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ओव्हलवर होणार असल्याने पुन्हा एकदा विराट मोठी खेळी करणार अशा अपेक्षा भारतीय चाहते करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतला खेळवल्यामुळे सेहवाग नाराज, सांगितले कार्तिकला खेळवण्याची का आहे गरज
सानिया मिर्झा-शोएब मलिक घटस्फोट! भारतीय टेनिसस्टारच्या ‘त्या’ पोस्टने सोशल मीडियावर उडाली खळबळ