---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक

On: गुरूवार, डिसेंबर 23, 2021 10:22 PM
Himachal Pradesh
---Advertisement---

बीसीसीआयच्या आयोजनात खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय ट्रॉफी २०२१-२२ च्या (Vijay Hazare trophy 2021-22) उपांत्यपूर्व सामने सामने बुधवारी (२२ डिसेंबर) संपले. आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेले चार संघ समोर आले आहेत. आता शुक्रवारी (२४ डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य सामने खेळले जाणार आहेत.

सर्विसेस, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि सौराष्ट्र या चार संघांनी उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान पक्के केले आहे. शुक्रवारी यातील पहिला उपांत्य सामन्यात सर्विसेस आणि हिमाचल प्रदेश यांच्यात होईल, तर दुसरा उपांत्य सामना तमिळनाडू आणि सौराष्ट्र यांच्यात खेळला जाईल. या सामन्यांमध्ये जिंकणारे संघ अंतिम सामन्यात पोहचतील.

मंगळवारी (२१ डिसेंबर) खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हिमाचल प्रदेशच्या संघाने उत्तर प्रदेशला ५ विकेट्सने मात दिली होती. या सामन्यात हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ९ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि ४३.३ षटकात २०८ धावा केल्या आणि विजय मिळवला.

त्यानंतर मंगळवारी (२१ डिसेंबर) दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडू आणि कर्नाटक संघात एकमेकांसोबत भिडले. कर्नाटकने या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर ३५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटक संघ २०३ धावांवर सर्वबाद झाला. तामिळनाडूने या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला. तामिळनाडू हिमाचल पाठोपाठ उपांत्य सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला.

बुधवारी (२२ डिसेंबर) तिसरा आणि चौथा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्र संघाने विदर्भाला ७ विकेट्सने मात दिली आणि उपांत्य सामन्यात पोहोचणारा तिसरा संघ ठरला. सौराष्ट्रने या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि विदर्भाला अवघ्या १५० धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने हे लक्ष्य अवघ्या २९.५ षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

त्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात केरळ आणि सर्विसेस संघ आमने सामने होते. सर्विसेसने या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. सर्विसेसने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली केरळ संघाला १७५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सर्विसेसने हे लक्ष्य ३०.५ षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

आता उपांत्य सामन्यात पोहोचलेल्या या चार संघांपैकी विजय मिळवणाऱ्या दोन संघामध्ये शनिवारी (२५ डिसेंबर) अंतिम सामना खेळला जाईल. चाहते शुक्रवारी होणाऱ्या या दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी उत्सूक आहेत.

विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२

उपांत्य फेरी – 
२४ डिसेंबर – पहिला सामना – सर्विसेस विरुद्ध हिमाचल प्रदेश – सकाळी ९ वाजता
२४ डिसेंबर – दुसरा सामना – तमिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र – सकाळी ९ वाजता

अंतिम सामना – २६ डिसेंबर – सकाळी ९ वाजता

महत्वाच्या बातम्या –

‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर

आयपीएल २०२२चा मेगा लिलाव केव्हा आणि कुठे होणार? घ्या जाणून

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकांपूर्वी रवी शास्त्रींचा हटके अंदाज, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

व्हिडिओ पाहा –

जगातील कोणत्याही फलंदाजाला १० प्रकारे तुम्ही करु शकता बाद । 10 Ways Batsman Can Be Given OUT

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---