---Advertisement---

रायुडूच्या थ्रीडी ट्विटबद्दल तब्बल २ वर्षांनी विजय शंकरने सोडले मौन; म्हणाला, “मी काहीच चुकीचं केलं नव्हतं”

On: सोमवार, मे 17, 2021 12:26 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला थ्रीडी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. २०१९ सालच्या विश्वचषकावेळी तत्कालिन संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी शंकरला हे नाव दिले होते. या विश्वचषकासाठी अंबाती रायुडूला भारतीय संघातील मधल्या फळीतील प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु संघ निवकर्त्यांनी त्याच्याऐवजी शंकरची निवड करत सर्वांचा थक्क केले होते.

त्यानंतर शंकर विश्वचषकात सपशेल फ्लॉप ठरल्याने आजही थ्रीडी क्रिकेटपटू या नावावरुन त्याला ट्रोल केले जाते. आता शंकरने याबद्दल वक्तव्य केले आहे.

विश्वचषक २०१९ मध्ये शंकरला रायुडू ऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेपूर्वी रायुडू भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळत होता. पण जेव्हा विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली; तेव्हा त्यात रायुडूचे नाव नव्हते व त्याच्याजागी शंकरची निवड झाली होती.

तत्कालीन संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यावर म्हणाले होते की, “विजय शंकर थ्रीडी प्लेयर आहे म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकतो.” यानंतर आपली निवड न झाल्याने संतप्त झालेल्या रायुडूने ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, ‘त्याने घरी बसून विश्वचषक सामना पाहण्यासाठी थ्रीडी चष्मा विकत घेतला आहे.’

याबाबत मौन सोडत आता शंकरने भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “माझा त्या ट्विटशी काहीही संबंध नव्हता. मी काहीही चुकीचे केले नव्हते. त्याने (रायुडू) एक टॅग दिला आणि तो व्हायरल झाला. पण त्या ट्विटनंतर मी विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून तीन सामने खेळले आणि चांगली कामगिरी देखील केली. बर्‍याच लोकांनी माझी तुलना रायुडूशी केली. पण तो ज्या जागेवर फलंदाजीला येत होता व मी ज्या जागी फलंदाजीस येत होतो त्यात फरक आहे. तुलना करणे चांगले आहे पण किमान आमच्या फलंदाजीची जागा बघायला हवी. बर्‍याच लोकांना हे माहित नसते. त्यांना फक्त माझ्या माध्यमातून सोशल मीडियावर मजा करायची असते.”

महत्त्वाच्या बातम्या-

Video: हेलिकॉप्टर कोसळलं! इंग्लिश फलंदाज खेळायला गेला धोनी फेम हेलिकॉप्टर शॉट अन् पडला तोंडघशी

“तुम्ही माझ्याकडेही बोट दाखवू शकता,” चेंडू छेडछाड प्रकरणी माजी ऑसी गोलंदाजी प्रशिक्षकाचे वक्तव्य

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘हे’ प्रमुख खेळाडू अजूनही आहेत अनफिट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---