मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात या सामन्यासाठी तीन बदल करण्यात आले आहेत. भारताकडून आज केदार जाधव, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर या तिघांना संधी देण्यात आली असून अंबाती रायडू, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना वगळण्यात आले आहे.
शंकरने या सामन्यातून वनडे पदार्पण केले आहे. तो भारताकडून वनडे पदार्पण करणारा 226 वा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याआधी भारताकडून 5 टी20 सामने खेळले आहेत.
त्याने कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 6 मार्च 2018ला टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने खेळलेल्या 5 टी20 सामन्यात त्याला 3 विकेट्स आणि 17 धावा करण्यात यश आले आहे.
Vijay Shanker is all set to make his debut for #TeamIndia 👏👏#AUSvIND pic.twitter.com/ErqruCeXBs
— BCCI (@BCCI) January 18, 2019
त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही तमिळनाडूकडून खेळताना चांगला खेळ केला होता. त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात 71 आणि नाबाद 51 अशी अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्यानंतरच्या हिमाचल विरुद्धच्या सामन्यातही त्याने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
देशांतर्गत क्रिकेटबरोबरच तो भारत अ संघाकडूनही बऱ्याच काळापासून खेळत असून त्यातही त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. नुकत्यान भारत अ संघाने केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने या दौऱ्यात 3 वनडे सामन्यात 94 च्या सरासरीने 188 धावा केल्या होत्या. तसेच 1 विकेटही घेतली होती.
त्याने आत्तापर्यंत 41 प्रथम श्रेणी सामन्यात 47.70 च्या सरासरीने 2099 धावा आणि 32 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 58 सामन्यात त्याने 37.12 च्या सरासरीने 1448 धावा आणि 43 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश
–टॉप १०: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वनडे सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष
–किंग कोहली करणार या भारतीय कर्णधाराबरोबर डान्स…