भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार यावर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ते हे पद पुन्हा स्विकारणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, सध्या भारतीय संघाचे भविष्यातील प्रशिक्षक म्हणून अनेक माजी खेळाडूंची नावे पुढे येत आहेत. आता नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड याचे नाव समोर येत आहे.
सध्या विक्रम राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यापूर्वी राहुल द्रविडला भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक बनवण्याची चर्चा माध्यमांमध्ये वेगाने सुरू होती. मात्र, त्याने यासाठी नकार दिल्याचे समजते.
यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संपूर्ण कोचिंग स्टाफचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयला त्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षक शोधावा लागेल.
राहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास नकार दिला
मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडचे नाव मुख्य प्रशिक्षक म्हणून आघाडीवर होते. पण त्याने यासाठी नकार दिला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. यापूर्वी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत-अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने बरेच यश मिळवले आहे.
याबरोबरच द्रविडचा एनसीए संचालक म्हणून करार संपला आहे. त्यामुळे बीसीसीआयने एनसीएच्या संचालक पदासाठी अर्ज मागवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने पुन्हा एनसीए (NCA) संचालक पदासाठी अर्ज केला आहे.
प्रशिक्षकाच्या शर्यतीत विक्रम राठोड आघाडीवर
द्रविडने एनसीए (NCA) संचालक पदासाठी पुन्हा अर्ज केल्याने त्याला एनसीएच्या संचालकपदावर कायम राहण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक पदासाठी विक्रम राठोडचे नाव पुढे येत आहे. विक्रम सध्या भारतीय संघासह काम करत आहेत. त्यामुळे तो खेळाडूंना जवळून ओळखतो. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीसोबतचे त्याचे संबंध देखील खूप चांगले आहेत. त्यामुळे तो या शर्यतीत आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा