---Advertisement---

‘ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण…’, रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांचे भाष्य

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 9:01 AM
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. असे असले तरी संघाच्या वरच्या फळीतील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने या सामन्यात देखील चाहत्यांची निराशा केली. भारतीय संघाच्या या दोन दिग्गजांनी मागच्या जवळपास एक वर्षापासून सतत खराब प्रदर्शन केले आहे. तरीदेखील संघ व्यवस्थापन त्यांना अनेकदा संधी देत आहे. आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या दिग्गजांविषयी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करतील.

भारतीय फलंदाजी प्रशिक्षक या दोन्ही फलंदाजांविषयी बोलताना म्हणाले की, यात शंकाच नाही की, आमच्या वरच्या फळीने योगदान दिले पाहिजे, तुम्ही ज्या क्रिकेटपटूंचा (पुजारा आणि रहाणे) उल्लेख केला आहे, त्यांनी ८० आणि ९० कसोटी सामने खेळले आहेत. एवढे सागळे सामने खेळण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी चांगले प्रदर्शन केले असेल.

पुढे बोलताता राठोड म्हणाले की, मला वाटते की, ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण त्यांनी यापूर्वी आमच्यासाठी खूपदा महत्त्वाची खेळी केली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ते पुनरागमन करतील आणि भविष्यात आमच्यासाठी महत्त्वाची खेळी करतील.

भारताच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर आहे. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. विराट मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या जाणारा न्यूझीलंडविरुद्धच्या पुढच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.

रहाणे आणि पुजारावर या सामन्यात महत्वाची जबाबदारी होती, पण ते चांगली फलंदाजी करू शकले नाहीत. दुसरीकडे या सामन्यातून भारतासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या आणि महत्वाचे योगदान दिले.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंड संघाची फलंदाजी आली होती आणि त्याचा सलामीवर विल यंग बाद होऊन तंबूत परतला. न्यूझीलंडने सध्या दुसऱ्या डावात १ बाद ४ धावा केल्या आहेत. आता न्यूझीलंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी २८० धावांची आवश्यकता आहे, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी ९ विकेट्सची आवश्यकता असेल. भारतीय संघाकडे हा सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’

लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

‘मी आयुष्यभर रंगभेदाचा सामना केला’; एल शिवरामकृष्णन यांचा सनसनाटी आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---