कुस्तीपटू विनेश फोगटला नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील शिस्तीच्या मुद्द्यांमुळे तात्पुरते निलंबित केले होते. त्यानंतर आता विनेशने भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) माफी मागितली आहे.
डब्ल्यूएफआयच्या सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तिने एक ई-मेल पाठवला आहे, समिती तिच्या प्रतिसादाकडे लक्ष देईल आणि ते त्यावर समाधानी आहेत की नाही यावर अवलंबून असेल. शिस्तपालन समिती निर्णय घेईल.
डब्ल्यूएफआयने कुस्तीपटू विनेश फोगाटला टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या वर्तनाबद्दल तात्पुरते निलंबित केले आहे. तसेच त्यांनी तिला तिच्या वर्तनाबद्दल कारण विचारले होते. एका सूत्राने एएनआयला सांगितले की, “होय, तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, आम्ही तिच्या उत्तराची वाट पाहत आहोत आणि त्यानंतर आम्ही कारवाईचा मार्ग ठरवू.”
कुस्तीपटू विनेश हंगेरीहून टोकियोला गेली होती, जिथे ती प्रशिक्षक वोलार अकोससोबत प्रशिक्षण घेत होती. टोकियोला पोहचल्यावर तिने स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि इतर भारतीय संघातील सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता. विनेशने भारतीय दलाच्या अधिकृत प्रायोजकाऐवजी खाजगी प्रायोजकाचे नाव असलेले सिंगलेटही परिधान केले होते.
उपांत्यपूर्व फेरीत झाली पराभूत
विनेश टोकियो २०२० मध्ये पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. पण उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर ती बाहेर पडली. तिला उपांत्यपूर्व फेरीत बेलारूसच्या व्हेनेसा कलाडिन्स्कायाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विनेशचे वर्तन वरिष्ठ खेळाडूसारखे नव्हते.
जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची शक्यता कमी
माध्यमांच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएफआयला उत्तर मिळाले आहे आणि विनेशने माफी मागितली आहे. माफी मागितली असूनही, तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी प्रवास करण्याची परवानगी मिळणार नसण्याची शक्यता जास्त आहे.
ओजीक्यू (ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट) आणि जेएसडब्ल्यू सारख्या खाजगी क्रीडा स्वयंसेवी संस्था ज्या प्रकारे काम करत आहेत, त्यावर डब्ल्यूएफआय समाधानी नाही. या संघटना कुस्तीपटूंसह अनेक भारतीय खेळाडूंना प्रायोजित करतात. डब्ल्यूएफआयच्या म्हणण्यानुसार, ही संस्था त्यांना बिघडवत आहे. डब्ल्यूएफआयने सांगितले की, ते भविष्यात वरिष्ठ कुस्तीपटूंच्या कामात हस्तक्षेप करू देणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘इंग्लंडचे गोलंदाजच भारताच्या विजयाला ठरू शकतात कारणीभूत’, पाहा असं का म्हणाला ब्रॉड