भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. विनेशची अपील सीएएसने (CAS) फेटाळली असून आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic) अपात्र ठरवण्यात आलं होतं. या संदर्भात तिनं रौप्य पदक देण्याचे अपील केलं होतं, त्याचा निर्णय 16 ऑगस्ट रोजी जाहीर होणार होता, मात्र आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे अपील फेटाळण्यात आलं आहे.
आता या प्रकरणानंतर विनेशने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक प्रकारच्या कमेंट्सही आल्या आहेत.
खरं तर, विनेशने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती भावूक झाल्याचे दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फोटोच्या कॅप्शनमध्ये विनेशने काहीही लिहिलेले नाही. पण अनेक चाहत्यांनी विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट केल्या आहेत. भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राने कमेंटमध्ये लिहिले की, “तू प्रेरणादायी आहेस. तू कौतुकास पात्र आहेस. तू भारताची रत्न आहेस.” मनिकासोबत इतर लोकांनीही विनेशसाठी प्रोत्साहनपर कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान विनेशने सीएएसकडे रौप्यपदकासाठी अपील केले होते. मात्र या निर्णयाची तारीख पुन्हा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. मात्र, अखेर बुधवारी निर्णय झाला. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते. तिचे वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरले होते. विनेशचे रौप्यपदक निश्चित होते. अपात्र ठरल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणाही केली होती.
विनेशने कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने 2014, 2018 आणि 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच तिने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.
हेही वाचा-
श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत अंपायरर्सकडून मोठी चूक, निकाल बदलला असता? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?