नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने रविवारी (२५ मे) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तो पाहून अनेकांचे मनोबल तर वाढेलच परंतु कठीण परिस्थितीत हार न मानण्याची ताकद देखील वाढेल.
खरंतर लक्ष्मणने (VVS Laxman) जो व्हिडिओ शेअर केला आहे तो एका दिव्यांग मुलाचा आहे. त्या मुलाच्या हातामध्ये समस्या असण्याखेरीज तो नेट्सवर उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहे. हा अपंग मुलगा (Handicapped) ज्याप्रकारे समोरच्या खेळाडूला गोलंदाजी करत आहे. ते पाहून मोठ्यातला मोठा खेळाडूही आश्चर्यचकीत होईल. या मुलाची आवड पाहून लक्ष्मणदेखील त्याचा चाहता झाला आहे.
The human spirit is one of ability, perseverance and courage that no situation can steal away. Salute to the spirit of human endurance and strength 🙏 pic.twitter.com/Y9im5mWJDm
— VVS Laxman (@VVSLaxman281) May 24, 2020
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करत लक्ष्मणने लिहिले की, “व्यक्तीची आवड त्याची क्षमता, चिकाटी आणि ध्यैर्य आहे. हे त्याच्याकडून कोणतीही परिस्थिती हिरावून घेऊ शकत नाही. मानवी सहनशक्ती आणि सामर्थ्याला सलाम.”
खरंतर लक्ष्मणने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ट्विटर वापरकर्त्यांनी एक लाख पेक्षा अधिक वेळा पाहिला आहे. तर ११ हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ लाईक करणाऱ्यांमध्ये भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचाही समावेश आहे.
लक्ष्मणने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक दिव्यांग मुले सराव करताना दिसत आहेत. यामध्ये हा मुलगा गोलंदाजी करत आहे. तर दुसरा मुलगा फलंदाजी करत आहे. इतकेच नव्हे तर या मुलांचे क्षेत्ररक्षण पाहून फीट खेळाडूही आश्चर्यचकीत होईल.
लक्ष्मणने शेअर केलेला हा व्हिडिओबद्दल आतापर्यंत समजले नाही की तो कुठला आणि कोणाचा आहे. यापूर्वी लक्ष्मणने रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) उपविजेता बंगाल (Bengal) संघाच्या फलंदाजांसाठी एक ऑनलाईन सत्राचे आयोजन केले होते. यादरम्यान त्याने मानसिक पैलूंवर भर दिला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२०२३ पर्यंत आयपीएलमध्ये दिसू शकतात ८ ऐवजी १० संघ
-थोडी वाट पहा, टीम इंडियात होऊ शकते सेहवागचे पदार्पण
-जडेजा, विराट नाही तर टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक