भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच त्या आधी झालेल्या आशिया चषकात देखील त्याने तुफान कामगिरी केलेली. त्याचा हाच शानदार फॉर्म पाहून आता इंग्लंडच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार मोईन अली याने महत्त्वाचे विधान केले आहे.
विराट कोहली मागील जवळपास तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नव्हता. यादरम्यान त्याने काही आश्वासक खेळ्या केल्या होत्या. परंतु, तो त्याचे रूपांतर मोठ्या खेळांमध्ये करू शकत नव्हता. परंतु, संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशिया चषकातून त्याने पुनरागमन केले.
या विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतक पूर्ण केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या टी20 विश्वचषकातही त्याचा फॉर्म तसाच राहिला. त्याच्या याच शानदार फॉर्मबाबत बोलताना मोईन अली म्हणाला,
“सध्या विराटचा खेळ पाहण्यासारखा होतोय. आता मला तो पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक वाटू लागला आहे. त्याची आशिया चषक व टी20 विश्वचषकासारखी कामगिरी आणखी होणार आहे.”
विराटने ऑस्ट्रेलिया झालेला टी20 विश्वचषक आपल्या फलंदाजीने अक्षरशः गाजवला होता. त्याने विश्वचषकात सहा सामने खेळताना 98.66 च्या जबरदस्त सरासरीने 296 धावा काढल्या होत्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. तसेच विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून त्याची नोंद झाली. त्यानंतर त्याने न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली होती. आता बांगलादेश दौऱ्यातून तो पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करताना दिसेल.
(Virat Is More Dangerous Now Moeen Ali Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार ऋतुराज! स्वतःचा सामनावीर पुरस्कार राजवर्धनला देत जिंकली सर्वांची मने
पाकिस्तानात खेळायचा एक रुपयाही घेणार नाही स्टोक्स! कारण वाचून कराल कौतुक