---Advertisement---

विराटने मोडला टी२०मधील दिलशानचा हा मोठा विक्रम

On: शनिवार, नोव्हेंबर 4, 2017 9:23 PM
---Advertisement---

राजकोट । येथे आज भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० सामन्यात विराट कोहलीने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा मोठा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानी आला आहे. 

विराटला या सामन्यापूर्वी हा विक्रम करण्यासाठी केवळ १२ धावांची गरज होती. विराटच्या नावावर या सामन्यापूर्वी  ५३ सामन्यात १८७८ धावा होत्या. भारतीय संघाने आजपर्यंत ८७ सामने खेळले असून विराटचा आजचा हा ५४ वा सामना होता. 

विराटला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २ हजार धावा करण्यासाठी आता केवळ ११० धावांची गरज आहे. 

जर तो या मालिकेत २ हजार धावा करू शकला तर टी२० प्रकारात अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू बनेल. सध्या पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 

२१४० ब्रेंडन मॅक्क्युलम
१८९०* विराट कोहली
१८८९ तिलकरत्ने दिलशान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment