---Advertisement---

Video: फॅब्यूलस फाफ! किंग कोहलीचा झेल घेत दाखवला तंबूचा रस्ता

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 7:36 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा ४४ वा सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने ८ विकेट्सने जिंकला. हा चेन्नईचा या हंगामातील चौथाच विजय होता. या सामन्यात चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू फाफ डू प्लेसिसने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीलाही तंबूचा रस्ता दाखवला.

विराटला ५० धावांवर धाडले तंबूत

झाले असे की, नाणेफेक जिंकून बेंगलोरने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान संघाची धावसंख्या १ विकेट गमावत ३१धावा असताना विराट फलंदाजीला आला. त्याने शानदार फलंदाज करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. आणि झपाट्याने आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करू लागला. यादरम्यान त्याने १९ व्या षटकाच्या ४ थ्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु तो नो बॉल होता. हे षटक सॅम करन टाकत होता. करनच्या शेवटच्या चेंडूवर विराटने जोरदार फटका मारला.

त्याचा हा फटका पाहून असे वाटले की चेंडू बाऊंड्रीच्या पार जातोय. परंतु तेवढ्यात चेन्नईचा धडाकेबाज क्षेत्ररक्षक फाफ डू प्लेसिसने चपळतेने विराटचा झेल झेलला. त्यामुळे विराटला ५० धावांवर तंबूत परतावे लागले.

फाफने घेतलेल्या झेलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Cric_life59/status/1320330901457227776

गुणतालिकेत सातव्या स्थानी

बेंगलोरविरुद्ध खेळताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ६५ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह २ गुण मिळवले आहेत. यासोबतच त्यांनी गुणतालिकेत सातव्या स्थानी उडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

-डू प्सेसिस सुपरमॅनच! विराट, डिविलियर्सचे घेतले भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

-करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

-IPL च्या १३ व्या हंगामात ‘हे’ ५ मॅच विनर खेळाडू ठरले सुपर फ्लॉप; पहिला क्रमांक आश्चर्यकारक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---