भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी कमी प्रकाशामुळे पंचांना वेळेआधी खेळ थांबवावा लागला. त्यांचा हा निर्णय भारतीय संघासाठी चांगला ठरला. कारण यावेळी जर भारताने एक किंवा दोन विकेट गमावल्या असत्या, तर नक्कीच संघाच्या अडचणी वाढल्या असत्या. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा कमी प्रकाश असतानाही खेळ का सुरू ठेवला गेला? यावरुन नाराज होते. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसून त्यांनी पंचांवर याबद्दल राग व्यक्त केला.
कमी प्रकाश असतानाही पंच खेळ थांबवत का नाहीयत, हे पाहून विराट आणि रोहितचा राग अनावर झाला होता. त्यांनी हात वर करुन पंतला खेळ थांबवायला सांगण्याचे इशारेही केले. अखेर पंतला ही बाब लक्षात आल्यानंतर तो पंचांना याबाबत बोलला. मग या संपूर्ण प्रकरणावर पंच आणि इंग्लंड संघामध्ये काही काळ चर्चाही झाली. अखेरीस मैदानावरील दोन्ही पंचांनी प्रकाशाचा अंदाज घेतला आणि दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेतला.
Gully cricket feels! Hum andhere me Batting nahi karenge kal subah do 😂#ENGvIND #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/u56MVDeeqb
— Karamdeep (@oyeekd) August 15, 2021
दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था सहा बाद 181 धावा अशी होती आणि भारताकडे 154 धावांची आघाडी आहे. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 14 धावांवर तर इशांत शर्माने 4 धावा करून खेळपट्टीवर तग धरून आहेत.
https://youtu.be/Y0ERTfTD6a4
सामन्याच्या चौथ्या दिवशी जर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली नसती तर भारताच्या अडचणी वाढल्या असत्या. दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंनी खडतर खेळपट्टीवर मोठ्या संयमाने फलंदाजी केली आणि भारताला संकटातून बाहेर काढले.परंतु, पुजारा दुर्दैवी ठरला. वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या जबरदस्त चेंडूवर जो रूटकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने 206 चेंडूत 45 धावा केल्या.
रहाणेने त्याच्यापेक्षा वेगवान फलंदाजी करत 146 चेंडूत 61 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोनेह रहाणेला 31 धावांवर असतांना मोईन अलीच्या चेंडूवर जीवदान दिले होते. त्याचा फायदा घेत अजिंक्यने अर्धशतक साजरे केले. शेवटच्या सत्रात दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर इंग्लंडने सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले.
या डावात भारतीय चाहत्यांनी विराट कोहलीकडून इंग्लिश कर्णधार जो रूटसारख्या मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. परंतु कोहलीने पुन्हा निराशा केली. कोहलीने 31 चेंडूत 20 धावा केल्या. सॅम करनच्या गोलंदाजीवर झेलबाद होत तो माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रूटच्या संयमाचा तुटला बांध, भर मैदानात पंतसोबत घातला वाद; फोटो व्हायरल
अन् दर्शक झाले अतिआनंदी, जणू पुजाराने शतक केल्यासारख्या वाजवल्या टाळ्या; पाहा नेमकं काय घडलं?
रोमहर्षक कसोटीत वेस्ट इंडिजची १ विकेटने बाजी, गोलंदाजांच्या अभेद्य भागिदारीने पाकिस्तान चितपट