भारतीय कर्णधार विराट कोहली व्यक्त होण्यासाठी ओळखला जातो आणि जर तो मैदानावरील एखाद्या गोष्टीशी सहमत नसेल तर तो संबंधित व्यक्तीला याची जाणीव करून देत असतो. इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या सुरुवातीच्या दिवशी असेच काहीसे घडले आहे.
त्याचे झाले असे की, भारताच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद मैदानात उतरले होते. मैदानावर आल्यानंतर हमीदने गार्ड घेण्यास सुरुवात केली, तेव्हा समस्या सुरू झाली. नियमानुसार, फलंदाज गार्डला त्याच्या क्रीजपासून ५ फूट दूर नेऊ शकत नाही. कारण फलंदाज जेव्हा पुढच्या पायाचा शॉट खेळतो तेव्हा तो खेळपट्टीच्या संरक्षित भागाला त्रासदायी ठरतो. अगदी याच कारणास्तव रिषभ पंतलाही मागील कसोटी दरम्यान पंचांनी आपला गार्ड बदलण्यास सांगितले होते.
फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर असल्याने भारतीय कर्णधार आधीच भडकला होता. त्यात संघाला लवकर विकेट घेण्याची गरजही होती. त्यामुळे विराट हमीदचे हे कृत्य शांतपणे बघणार नव्हता. त्याने मैदानावरील पंचांकडे हमीदने घेतलेल्या गार्डबद्दल तक्रार केली. यावर पंच आणि विराट यांच्यात चर्चाही झाली. अगदी समोलोचक हर्षा भोगलेंनीही हमीदची कृती चुकीचे असल्याचे सांगितले.
What is your take on batsmen marking their guard perilously close to the forbidden area of the pitch?
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Hameed #Pant pic.twitter.com/pFuW2n3vEi
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 2, 2021
तथापि, हमीद फार काळ मैदानावर टिकला नाही. कारण जसप्रीत बुमराहने हमीदला चालते केले. बुमराहने डावाच्या चौथ्या षटकात आणि त्याच्या दुसऱ्या षटकात दोन्ही इंग्लिश सलामीवीरांना तंबूत पाठवून इंग्लंडला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर उमेश यादवने रूटचा अडथळा दूर करून भारताचे पारडे अजून जड केले.
याआधी, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नाही. भारताचे रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. केवळ विराटने अर्धशतकीय खेळी करत थोडीफार झुंज दिली.
जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरी, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र आक्रमक फलंदाजी करत ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजबच!! एकही वाईड, नो बॉल न टाकता देखील गोलंदाजाला टाकावे लागले ७ चेंडू, वाचा कारण
जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागे ‘अशी’ होती कर्णधार कोहलीची रणनिती, पण शेवटी झाली निराशा